साधू-संत, संपत्ती आणि हत्या.. आत्तापर्यंत अनेक साधू-संतांना गमवावा लागला आहे जीव
आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू 20 सप्टेंबरला झाला. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये अनेक उल्लेख आहेत. खास करून त्यांचा शिष्य आनंद गिरी यांच्या विषयी उल्लेख आहेत. हे सुसाईड नोट सात ते आठ पानांचं आहे असंही पोलिसांनी सांगितलं आहे. नरेंद्र गिरी यांचा मृत्यू कसा झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस ही आत्महत्या असल्याचं म्हणत […]
ADVERTISEMENT

आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू 20 सप्टेंबरला झाला. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये अनेक उल्लेख आहेत. खास करून त्यांचा शिष्य आनंद गिरी यांच्या विषयी उल्लेख आहेत. हे सुसाईड नोट सात ते आठ पानांचं आहे असंही पोलिसांनी सांगितलं आहे. नरेंद्र गिरी यांचा मृत्यू कसा झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस ही आत्महत्या असल्याचं म्हणत आहेत. तर अनेक जणांना यामागे कट आहे आणि ही हत्या आहे असं वाटतं आहे. हा सगळा वाद संपत्तीचा आहे असंही बोललं जातं आहे.
संत, संपत्ती आणि खुनाचे कट अशा सगळ्या घटना याआधीही घडल्या आहेत. ज्यामध्ये अनेक साधूंना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. नरेंद्र गिरी यांच्या बाबत घडलेली ही पहिली घटना नाही.
90 च्या दशकात अशीच एक घटना घडली होती. 1991 मध्ये एका संताची हत्या झाली होती. 25 ऑक्टोबर 1991 ला रामायण सत्संग भवनचे संत राघवाचार्य हे आश्रमाच्या बाहेर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी स्कूटरवरून आलेल्या काही जणांना त्यांना घेरलं आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर चाकूनेही वार केले आणि त्यांची अत्यंत निर्घृण हत्या केली.
हत्येची ही मालिका इथूनच सुरू झाली होती. यानंतर 9 डिसेंबर 1993 ला संत राघवाचार्य यांचे सहकारी रंगाचार्य यांचीही ज्वालापूरमध्ये हत्या करण्यात आली. यानंतर हरिद्वारमध्ये चेतनादास आश्रमाता अमेरिकी साध्वी प्रेमानंद यांची डिसेंबर 2000 मध्ये हत्या करण्यात आली. हत्येच्या आधी त्यांना लुटण्यात आलं होतं.