मनसुख हिरेन हत्या प्रकरणावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणी आता एक घडामोड समोर येते आहे. महाराष्ट्र एटीएसने मुंबईतल्या कांदिवली येथे काम करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची चौकशी सुरू केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने हे गुन्हे शाखेच्या युनिट ११ साठी काम करतात. हे युनिट मुंबईतील कांदिवली भागात येतं. महाराष्ट्र एटीएसने आता सुनील माने यांची चौकशी सुरू केली आहे.
मनसुख हिरेन प्रकरण : एटीएसकडून हत्येचा गुन्हा दाखल
मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची पत्नी विमला हिरेन यांनी जो जबाब नोंदवला होता त्या जबाबात त्यांनी कांदिवलीच्या गुन्हे शाखेचा उल्लेख केला होता. “माझे पती मनसुख हिरेन यांनी ४ तारखेच्या रात्री घर सोडलं तेव्हा मी कांदिवली येथे काम करणाऱ्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याला भेटायला जात आहे असं सांगितलं होतं. त्यांचं आडनाव तावडे असल्याचंही त्यांनी मला सांगितलं.” असा उल्लेख विमला हिरेन यांच्या जबाबात आहे. आता या प्रकरणी सुनील माने यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. “आम्ही सुनील मानेंची चौकशी सुरू केली आहे. मात्र लगेच काही सांगता येणं थोडं घाईचं ठरेल” असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे.
कोण होते मनसुख हिरेन?? त्या दिवशी काय घडलं, जाणून घ्या घटनाक्रम
गुरुवारी रात्री उशिरा सुनील माने यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे पोलीस गुन्हे शाखेसाठी काम करणाऱ्या आणखी एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचीही चौकशी होणार आहे.