महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021-22: काय स्वस्त, काय महाग

मुंबई तक

मुंबई: महाराष्ट्राचा 2021-22 या आर्थिक वर्षासाठी आजा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी काही महत्त्वाच्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या आहेत. मात्र, या अर्थसंकल्पानंतर कोणत्या गोष्टी स्वस्त होणार आणि कोणत्या गोष्टी महाग होणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र, यावेळी याबाबत फार मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या नाही. यावेळी फक्त मद्यावरील कर पाच टक्क्यांनी वाढविण्यात आल्याची घोषणा करण्यात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्राचा 2021-22 या आर्थिक वर्षासाठी आजा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी काही महत्त्वाच्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या आहेत. मात्र, या अर्थसंकल्पानंतर कोणत्या गोष्टी स्वस्त होणार आणि कोणत्या गोष्टी महाग होणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र, यावेळी याबाबत फार मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या नाही. यावेळी फक्त मद्यावरील कर पाच टक्क्यांनी वाढविण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.

दुसरीकडे पेट्रोल-डिझेलवर जे राज्य सरकारकडून कर लावण्यात येत आहेत त्यामध्ये काही कपात केली जाईल अशी सर्वांनाच आशा होती मात्र, यामध्ये काहीही बदल करण्यात आलेले नाही. त्यामुळे आता पुढील काही दिवस तरी राज्याला महागाईची झळ सोसावीच लागणार आहे.

पाहा काय स्वस्त, काय महाग:

मद्यावरील करामध्ये तब्बल 5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. व्हॅट 60 टक्क्यावरुन 65 टक्के करण्यात आल्याने आता राज्यात दारु महागणार आहे.

3 लाख रुपये मर्यादेपर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज मिळणार

घर खरेदी करताना त्याची नोंदणी महिलेच्या नावे केल्यास मुद्रांक शुल्कात 1 टक्क्यांची सवलत दिली जाणार

ग्रामीण विद्यार्थिंनींना गावापासून शाळेपर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय

विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थींकरिता घरकूल योजना राबवली जाणार.

Budget 2021: दारु महागणार, मद्यावरील व्हॅटमध्ये ‘एवढी’ वाढ!

दरम्यान, गेल्या वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय राज्याला घ्यावा लागला. ज्याचा परिणाम राज्याच्या महसूल उत्पन्नावर झाला. दरवर्षीच्या तुलनेत मागील वर्षी साधारण 50 टक्के महसुलात तूट झाली असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, असं असलं तरीही आता हळूहळू राज्याची आर्थिक घडी बसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशावेळी नव्या आर्थिक वर्षात 2 लाख 18 हजार 263 कोटी एवढं कर संकलानचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे याचाच एक भाग म्हणून मद्यावरील व्हॅटमध्ये देखील वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.

आज सादर झालेल्या बजेटमध्ये १० हजार २२६ कोटींची महसुली तूट तर राजकोशीय तूट ६६ हजार कोटी आहे असं अजित पवार यांनी जाहीर केलं. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने सरकार राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना राबवणार आहे. या योजनेत घर खरेदी केल्यास त्यावर एक टक्का मुद्रांक शुल्क सवलत देण्यात येईल असंही आज अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp