महाराष्ट्रात 1 मेनंतर Lockdown वाढणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलं उत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. या लाटेवर नियंत्रण मिळावं म्हणून महाराष्ट्रात 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन आहे. अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. भाजीपाला, इतर दुकानं ही सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सध्या राज्यात सुरू आहेत. अशात हे निर्बंध 1 मेनंतर उठवले जातील का? असा प्रश्न इंडिया टुडेचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारला त्यावर राजेश टोपे यांनी दिलेलं उत्तर महत्त्वाचं आहे.

नेमकं काय म्हणाले राजेश टोपे?

मुंबई आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी केसेस कमी होत आहेत. लॉकडाऊनच्या संदर्भात 30 एप्रिलला निर्णय घेतला जाईल. कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रणात येत असेल तर लॉकडाऊन वाढवला जाणार नाही मात्र संख्या नियंत्रणात येत नाही असं दिसून आलं तर मात्र लॉकडाऊन काही दिवसांसाठी वाढवला जाईल. 30 एप्रिलला हा निर्णय होईल. माननीय मुख्यमंत्री कॅबिनेटला विचारात घेऊन हा निर्णय घेत असतात. कोरोना रूग्णसंख्येचा आलेख वाढताना दिसला तर लॉकडाऊन वाढवावाच लागेल. मात्र तो खाली येताना दिसला तर काही निर्बंध शिथील करण्यात येतील असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातला Lockdown वाढणार का? जाणून घ्या उत्तर

कोरोना संकट महाराष्ट्रात इतकं गहिरं आहे तरीही औषधं असतील, लसी, ऑक्सिजन या सगळ्यावरून राजकारण होतं आहे असं दिसतं का? केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात आणि भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात संघर्ष दिसून येतो आहे का? असे प्रश्न जेव्हा राजेश टोपे यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी या प्रश्नांनाही उत्तरं दिली.

ADVERTISEMENT

केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात मुळीच कोणताही संघर्ष नाही. आम्ही आम्हाला कोरोना संकटाशी लढण्यासाठी ज्या काही मागण्या आहेत त्या करत आहोत. रेमडेसिवीर, ऑक्सिजन, लसी यासाठीच्या मागण्या नम्रपणे करण्यात काहीही संघर्षाचा मुद्दाच येत नाही. केंद्र सरकारकडूनही आम्हाला मदत मिळते आहे. रेमडेसिवीर असेल किंवा लसी असतील किंवा अगदी ऑक्सिजनचा पुरवठा असेल आमचं म्हणणं फक्त इतकंच आहे की तो आमची जेवढी गरज आहे तेवढा द्या. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे केंद्राशी संघर्ष असण्याचं काही कारणच नाही. त्यांनी आम्हाला गेल्या आठवड्यात रेमडेसिवीरही उपलब्ध करून दिले असं उत्तर राजेश टोपे यांनी दिलं आहे.

ADVERTISEMENT

Covid Emergency: महाराष्टात Oxygen, रेमडेसिवीर, बेड, प्लाझ्मा कोणतीही वैद्यकीय मदत हवी? तर हे फोन नंबर येतील कामी

भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असाही संघर्ष महाराष्ट्रात नाही. कोरोना हा आपल्या राज्यावरचं संकट आहे. या संकट काळात लोकांचे जीव वाचवणं हे सरकारपुढचं उद्दीष्ट आहे आम्हाला यामध्ये कोणतंही राजकारण करायचं नाही. आमच्या बाजूने तरी आम्ही हाच निर्णय घेतला आहे. म्हणजे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते या सगळ्यांनी हाच निर्णय घेतला आहे की कोरोनावरून राजकारण करायचं नाही. भाजपने राजकारण करायचं ठरवलं असेल तर त्याला आमचा काही इलाज नाही. आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी विश्वासात घेऊन करतो आहोत. आमचं कुठे चुकत असेल तर त्यांनी जरूर सांगावं आम्ही भाजपचा सल्ला ऐकू मात्र आत्ता कोणतंही राजकारण करण्याची ही वेळ नाही असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT