महाराष्ट्रात दिवसभरात 3187 नवे कोरोना रूग्ण, 49 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात दिवसभरात 3187 नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात 49 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर हा 2.12 टक्के इतका आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात 3253 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण 63 लाख 68 हजार 530 रूग्णांना डिस्चाज् देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात दिवसभरात 3187 नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात 49 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर हा 2.12 टक्के इतका आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात 3253 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण 63 लाख 68 हजार 530 रूग्णांना डिस्चाज् देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97.26 टक्के इतका झाला आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 88 लाख 84 हजार 819 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 47 हजार 793 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज घडीला राज्यात 2 लाख 52 हजार 309 जण होम क्वारंटाईन आहेत. तर 1453 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. तर आज राज्यात 36675 सक्रिय रूग्ण आहेत.
20 सप्टेंबरला सात महिन्यांमधली निचांकी संख्या