Unlock : लग्नाला 100 माणसं बोलवायची की 200 ?; लग्न सोहळ्याच्या निर्बंधाबद्दल टोपे काय म्हणाले?

जाणून घ्या राजेश टोपे यांनी याबाबत काय उत्तर दिलं आहे?
Unlock : लग्नाला 100 माणसं बोलवायची की 200 ?; लग्न सोहळ्याच्या निर्बंधाबद्दल टोपे काय म्हणाले?

14 एप्रिलपासून राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधातून राज्य सरकारने नागरिकांची काहीअंशी मुक्तता केली आहे. आज (11 ऑगस्ट) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी राज्यातील निर्बंध काही हटवण्यात येत असल्याची माहिती दिली. लग्न सोहळ्यासंदर्भातील निर्बंधही राज्य सरकारने काही प्रमाणात हटवले असून, त्याबद्दलच्या नियमांचीही टोपे यांनी माहिती दिली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 15 ऑगस्टपासून राज्यातील निर्बंध काही प्रमाणात हटवण्यात येत असल्याचं सांगितलं. यावेळी टोपे यांनी लग्न सोहळ्यांबद्दलच्या नियमांचीही माहिती दिली. कोणत्या लग्न सोहळ्याला 100 किंवा 200 माणसं बोलावता येणार याबद्दलही त्यांनी माहिती दिली.

राजेश टोपे म्हणाले, 'लग्न सोहळ्यांवर घालण्यात आलेले निर्बंधही शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे लग्न सोहळे मंगल कार्यालयात होतील, तिथे फक्त १०० माणसांना वा मंगल कार्यालचा परवानगी असणार आहे. तर मोकळ्या जागेत होणाऱ्या लग्न सोहळ्याला 200 माणसांना बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मंदिरात जाऊन देव दर्शन नाहीच!

लॉकडाऊनचे निर्बध शिथिल करताना सरकारकडून मंदिरं खुले करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती. मात्र, सरकारनं मंदिरं न उघडण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. मंदिरांबरोबरच चित्रपटगृह आणि नाट्यगृहही बंदच असणार आहे. तर मॉल्स सुरू करण्यासही राज्य सरकारनं अटींसह परवानगी दिली आहे. दोन डोस झालेल्या व्यक्तींनाच मॉल्समध्ये प्रवेश देण्यास मुभा देण्यात आली असून, त्यासाठी प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याची निर्देशही सरकारनं दिले आहेत.

उपहारगृहं रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना यासंदर्भातला प्रस्ताव समोर आला. ज्यानंतर यासंदर्भातला निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे हॉटेल्स, रेस्तराँ आणि मॉल्स यांना दिलासा देण्यात आला असला तरीही धार्मिक स्थळं, सिनेमागृहं आणि नाट्यगृहं पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार आहेत.

उपाहारगृहे (रेस्तराँ) यांना त्यांच्या क्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत मान्यता देण्यात आलेली आहे. खुल्या प्रांगणात किंवा लॉनमध्ये या ठिकाणी होणारे जे विवाहसोहळे आहेत, त्याला जास्तीत जास्त 200 संख्येची परवानगी असेल आणि हॉलमध्ये जी आसन क्षमता असते, त्यामध्ये 50 टक्के परवानगी देण्यात आलेली आहे किंवा 100 या पेक्षा जास्त नाही.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील सर्व हॉटेल्स, दुकानं आणि रेस्तराँ ही आता रात्री दहापर्यंत सुरू राहणार आहेत. कोव्हिड प्रोटोकॉल पाळणं हे मात्र बंधनकारक असणार आहे. हॉटेलच्या मालकांनी, कर्मचाऱ्यांनी आणि हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांनी कोव्हिड प्रोटोकॉल पाळलाच पाहिजे असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. तसं न आढळून आल्यास कारवाई केली जाईल असाही इशारा देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in