गोठवणारी थंडी! धुळ्यात तापमान 2.8 अंशांवर, राज्यातल्या अनेक शहरांमध्ये हुडहुडी कायम
धुळ्यातल्या तापमानाचा पारा 2.8 अंशांवर गेला आहे. त्यामुळे राज्यातल्या सर्वात निचांकी तापमानाची नोंद धुळ्यात करण्यात आली आहे. कृषी महाविद्यालय धुळे यांनी ही नोंद केली आहे. तीन दिवसांपूर्वी धुळ्यात 6.8 अंश इतक्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली होती. आता धुळ्यात पारा 2.8 अंशावर गेला आहे. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. हाडं गोठवणाऱ्या थंडीत नागरिक कानटोपी, […]
ADVERTISEMENT

धुळ्यातल्या तापमानाचा पारा 2.8 अंशांवर गेला आहे. त्यामुळे राज्यातल्या सर्वात निचांकी तापमानाची नोंद धुळ्यात करण्यात आली आहे. कृषी महाविद्यालय धुळे यांनी ही नोंद केली आहे. तीन दिवसांपूर्वी धुळ्यात 6.8 अंश इतक्या नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली होती. आता धुळ्यात पारा 2.8 अंशावर गेला आहे. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे.
हाडं गोठवणाऱ्या थंडीत नागरिक कानटोपी, मफलर, स्वेटर अशा गरम कपड्यांचा आधार घेतच बाहेर पडत आहेत आणि शरीराचं रक्षण करत आहेत. तसंच अनेक जण शेकोटीचाही आधार घेताना दिसत आहेत. राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या थंडीचा सामना करावा लागतो आहे.
सातपुड्याच्या डोंगराळ भागात गेल्या चार दिवसांपासून कडाक्याची थंडी असून तिचा परिणाम जनजीवनावर होत आसल्याने चित्र पाहण्यास मिळत आहे थंडी पासून बचावासाठी जागोजागी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहे.त्याच प्रमाणे सपाटी भागात तापमान 8 अंश च्या जवळपास आसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे केळी आणि पपई उत्पादक शेतकरी आडचानीत आले आहे पपई आणि केळी पिकावर थंडीचा परिणाम होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी पॉलिथिनचे आवरण फळांवर घातले आहे.अजून तीन दिवस थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.