रेशनकार्ड केशरी असो की पांढरं… Mucormycosis च्या रुग्णाचा सर्व खर्च सरकार करणार: राजेश टोपे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: कोरोना पाठोपाठ Mucormycosis (काळी बुरशी) या नव्या आजाराने महाराष्ट्राला आता विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. राज्यात या आजाराचे रुग्ण अत्यंत झपाट्याने वाढत आहेत. राज्यात जवळजवळ 1500 हून अधिक लोकांना या आजाराची लागण झाली होती. ज्यापैकी 500 रुग्ण हे बरे झाले आहेत तर आतापर्यंत या आजाराने महाराष्ट्रात 90 जणांचा जीव घेतला आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात Mucormycosis चे 800 ते 850 रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत. अशावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (19 मे) पत्रकार परिषद घेऊन एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

यावेळी राजेश टोपे यांनी जाहीर केलं आहे की, Mucormycosis या आजाराची लागण झालेल्या रुग्णांवर आता शासन महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून सर्व खर्च करणार आहे.

यावेळी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे की, पिवळं, केशरी किंवा अगदी पांढऱ्या रंगाचं रेशनकार्ड असलं तरीही म्युकोरमायकोसिस असलेल्या रुग्णावर पूर्णपणे मोफत उपचार केले जाणार आहेत. पाहा याबाबत राजेश टोपे नेमकं काय म्हणाले:

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘म्युकोरमायकोसिस आजाराच्या बाबतीत सध्याच्या घडीला सगळ्यायत महत्त्वाची अडचण ही आहे की, त्या आजारात उपचारासाठी लागणाऱ्या ‘अॅम्फोटेरिसिन बी’ या इंजेक्शनची कमतरता. कारण साधारण दररोज सहा इंजेक्शन हे प्रत्येक रुग्णाला लागतात. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून म्युकोरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार करणार आहोत. याबाबत मी महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील ज्या लोकांकडे कोणतं ना कोणतं रेशनकार्ड आहे मग ते पिवळं असो, केशरी किंवा पांढरं असो. त्यांचा देखील या आजारावरील उपचारांसाठी अंतर्भाव करण्यात आला आहे.’ असं राजेश टोपे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

‘या आजाराच्या अनुषंगाने वेगवेगळ्या सर्जरी कराव्या लागतात. म्हणून सर्वसाधारण रुग्णालयात रुग्णाला दाखल करणं योग्य नाही. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये असलेल्या हजार हॉस्पिटलपैकी ज्या हॉस्पिटलमध्ये या सगळ्याची सुविधा आहे अशा हॉस्पिटलची नावं आपण जाहीर करत आहोत.’

ADVERTISEMENT

Mucor mycosis मुळे महाराष्ट्रात 90 मृत्यू, पुढचे दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे-राजेश टोपे

ADVERTISEMENT

‘सांगायचा मुद्दा हाच आहे की, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून दीड लाख रुपयांचं कव्हर हे प्रत्येक कुटुंबाला मिळत आहेत. परंतु महाविकासआघाडी सरकारने जाणीव पूर्वक म्युकोरमायकोसिस आजारासाठी जेवढा काही खर्च लागणार आहे त्या अनुषंगाने यामध्ये तरतूद केलेली आहे. त्यामुळे दीड लाखांच्या वर जो काही खर्च होणार असेल मग तो सहा लाख असो की आठ लाख तो या जनआरोग्य योजनेतून संबंधित रुग्णालयांना दिला जाणार आहे.’ असंही राजेश टोपे यावेळी म्हणाले.

म्युकोरमायकोसिस: ‘साहेब अ‍ॅम्फोटेरिसिन बी’ इंजेक्शनचा तुटवडा होऊ देऊ नका, नाहीतर…’

‘याशिवाय साधारणपणे ज्या रुग्णालयांमध्ये यावर उपचार सुरु आहेत त्यासाठी लागणारे सर्व औषधं ही शासनाच्या वतीने मोफत दिली जात आहेत. त्यामुळे म्युकोरमायकोसिसच्या रुग्णांनी पैसे नाही आणि मी उपचार घेऊ शकत नाही या गोष्टीची काळजी करु नये. हे मी खात्रीपूर्वक सांगतो.’ अशी मोठी घोषणा राजेश टोपे यांनी यावेळी केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT