केरळच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपकडून ‘या’ मोठ्या नावाची घोषणा

मुंबई तक

तिरुअनंतपुरम: केरळ विधानसभा निवडणुकीची घोषणा काही दिवसांपूर्वीच झालेली असून आता इथे सत्ता मिळवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली. याच पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून घेण्यात आला आहे. तो म्हणजे केरळमध्ये भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार हे ई. श्रीधरन हे असणार आहे. देशातील मेट्रो मॅन अशी ओळख असणारे ई श्रीधरन आता आपल्याला राजकारण्याचा आखाड्यात दिसणार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

तिरुअनंतपुरम: केरळ विधानसभा निवडणुकीची घोषणा काही दिवसांपूर्वीच झालेली असून आता इथे सत्ता मिळवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली. याच पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून घेण्यात आला आहे. तो म्हणजे केरळमध्ये भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार हे ई. श्रीधरन हे असणार आहे.

देशातील मेट्रो मॅन अशी ओळख असणारे ई श्रीधरन आता आपल्याला राजकारण्याचा आखाड्यात दिसणार आहेत. ई श्रीधरन यांचा भाजपमधील प्रवेश हा केरळ भाजपसाठी मोठं यश मानलं जात आहे. मेट्रो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीधरन हे या उत्तम स्वच्छ प्रतिमेचे प्रशासकीय अधिकारी अशी आहे. दरम्यान, 25 फेब्रुवारी 2021 रोजी ई श्रीधरन यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता.

पाच राज्यातील निवडणुकीविषयी बातमी: बंगाल, आसाम, केरळसह पाच राज्यांधील निवडणुकांच्या तारखा जाहीर

राजधानी दिल्लीत मेट्रो अस्तित्वात आणण्यामध्ये ई श्रीधरन यांचा खूप मोठा हातभार आहे. दिल्ली मेट्रो व्यतिरिक्त श्रीधरन यांनी कोलकाता मेट्रो, कोची मेट्रो आणि देशातील वेगवेगळ्या मेट्रो प्रकल्पांसाठी मोलाची कामगिरी केली आहे. म्हणूनच त्यांना भारताचे ‘मेट्रो मॅन’ असे म्हटले जाते.

हे वाचलं का?

    follow whatsapp