Mood Of The Nation : देशात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून कुणाला पसंती? वाचा इंडिया टुडेचा सर्व्हे

मुंबई तक

अनपेक्षित अशी खेळी करत बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक पुढच्या महिन्यात होणार आहे. तर गोव्यासह इतर चार राज्यांमध्येही विधानसभा निवडणूक होणार आहे. अशात ममतादीदींनी सपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तरप्रदेशात सपा, काँग्रेस विरूद्ध भाजप अशी तिरंगी लढत होणार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

अनपेक्षित अशी खेळी करत बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक पुढच्या महिन्यात होणार आहे. तर गोव्यासह इतर चार राज्यांमध्येही विधानसभा निवडणूक होणार आहे. अशात ममतादीदींनी सपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तरप्रदेशात सपा, काँग्रेस विरूद्ध भाजप अशी तिरंगी लढत होणार आहे. निवडणुकीच्या या धामधुमीत इंडिया टुडे आणि सी व्होटर्सने एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये दोन प्रश्न विचारण्यात आले होते. संपूर्ण देशात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? तर राज्याराज्यांमध्ये कोण लोकप्रिय आहे?

Mood Of The Nation : देशाचे पुढचे पंतप्रधान म्हणून कुणाला पसंती? काय सांगतो इंडिया टुडेचा सर्व्हे?

सर्वात आधी आपण समजून घेऊ की देशात सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री या प्रश्नाचं उत्तर लोकांनी काय दिलं आहे?

योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेश -27 टक्के

अरविंद केजरीवाल, दिल्ली- 19.9 टक्के

ममता बॅनर्जी, पश्चिम बंगाल-10.8 टक्के

एम. के. स्टॅलिन, तामिळनाडू-6.7 टक्के

उद्धव टाकरे, महाराष्ट्र-4.9 टक्के

वाय. एस. जगनमोह रेड्डी-3.3 टक्के

नवीन पटनायक-3.3 टक्के

नितीश कुमार-2.3 टक्के

देशात सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारला असता 27 टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांच्या नावाला पसंती दिली आहे. इतर मुख्यमंत्र्यांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे. दुसऱ्या क्रमांकावर अरविंद केजरीवाल आणि तिसऱ्या क्रमांकावर ममता बॅनर्जी आहेत.

आपल्या आपल्या राज्यांमध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री कोण आहे? हा सर्व्हेतला दुसरा प्रश्न होता त्याचं उत्तर काय आहे ते जाणून घेऊ

नवीन पटनायक, ओदिशा-71.1 टक्के

ममता बॅनर्जी, पश्चिम बंगाल-69.9 टक्के

एम. के स्टॅलिन, तामिळनाडू-67.5 टक्के

उद्धव ठाकरे, महाराष्ट्र-61.8 टक्के

पिनरयी विजयन, केरळ, 61.1 टक्के

अरविंद केजरीवाल-57 टक्के

हिमंता बिश्वा सर्मा, आसाम-56.6 टक्के

भुपेश बघेल, छत्तीसगढ-51.4 टक्के

अशोक गेहलोत, राजस्थान-44.9 टक्के

ओदिशा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, आसाम, छत्तीगढ आणि राजस्थान या नऊ राज्यांपैकी सर्वात जास्त लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून नवीन पटनायक यांना 71 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. त्यांच्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडलं आहे त्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना निवडलं आहे. चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही अशा राज्यांमध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून नवीन पटनायक हे क्रमांक एकवर आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp