महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज , 119 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजार 240 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण 62 लाख 43 हजार 34 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.5 टक्के इतका झाला आहे. आज दिवसभरात राज्यात 4 हजार 355 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.

आज राज्यात 119 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 26 लाख 32 हजार 810 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 32 हजार 649 नमुने पॉझटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात 3 लाख 1 हजार 955 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2330 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 49 हजार 752 सक्रिय रूग्ण आहेत. आज महाराष्ट्रात 4 हजार 355 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 64 लाख 32 हजार 649 इतकी झाली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आज कोव्हिड पोर्टलवरील मृत्यू संख्येनुसार जिल्ह्यांमधील कोविड मृत्यूंचे रिकाँसिलिएशन करण्यात आले आहे.त्यामुळे राज्याच्या एकूण मृत्यू संख्येत 169 ने वाढ झाली आहे. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोव्हिड 19 बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो, असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

मुंबईत 270 नवे रूग्ण

ADVERTISEMENT

मुंबईत 270 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 279 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे. तर आत्तापर्यंत मुंबईत 7 लाख 20 हजार 478 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मुंबईचा डबलिंग रेट 1958 दिवसांवर गेला आहे. तर मुंबईत आज घडीला 2791 सक्रिय रूग्ण आहेत. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

पुण्यात 205 नवे रूग्ण

पुण्यात 205 नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 250 रूग्णांन दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात 3 मृत्यूंची दिवसभरात नोंद झाली आहे. आत्तापर्यंत पुण्यात 4 लाख 83 हजार 5 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT