महाराष्ट्रात सलग ८ हजारांपेक्षा जास्त रुग्ण, पाहा महत्त्वाचे अपडेट
महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी ८ हजारांपेक्षा जास्त कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील चोवीस तासात राज्यात ५६ मृत्यूंची नोंद झाली आहे. दिवसभरात ३ हजार ७४४ रूग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण २० लाख १२ हजार ३६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात सध्या ३ लाख ५ हजार ७४५ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर २ […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी ८ हजारांपेक्षा जास्त कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील चोवीस तासात राज्यात ५६ मृत्यूंची नोंद झाली आहे. दिवसभरात ३ हजार ७४४ रूग्ण बरे झाले आहेत.
राज्यात आत्तापर्यंत एकूण २० लाख १२ हजार ३६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात सध्या ३ लाख ५ हजार ७४५ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर २ हजार ५२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज घडीला महाराष्ट्रात ६४ हजार २६० अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. महाराष्ट्र शासनच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
कोरोना रुग्णसंख्येबाबतचे महत्त्वाचे अपडेट
दरम्यान, मुंबई महापालिकेत गेल्या २४ तासात 1145 रुग्ण सापडले आहेत. तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूरमध्ये मुंबईपेक्षाही अधिक रुग्ण सापडले आहेत. मागील 24 तासात नागपूरमध्ये 1164 रुग्ण सापडले आहेत. तर पुण्यात 1096 कोरोनाबाधित सापडले आहेत.