थरकाप उडवणारी घटना! रायगडमध्ये आईने पोटच्या सहा मुलांना फेकलं विहिरीत, महिलेला वाचवण्यात यश

महाड तालुक्यातील बोरवडी गावातील घटना, मृतांमध्ये पाच मुली आणि एका मुलाचा समावेश
थरकाप उडवणारी घटना! रायगडमध्ये आईने पोटच्या सहा मुलांना फेकलं विहिरीत, महिलेला वाचवण्यात यश

महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना रायगड जिल्ह्यात घडली आहे. आईने पोटच्या सहा मुलांना विहिरीत ढकलून देत मारून टाकलं. प्राथमिक माहितीनुसार महिलेनं कौटुंबिक वादातून महिलेनं टोकाचं पाऊल उचललं. मुलांना विहिरीत फेकणाऱ्या महिलेला वाचवण्यात यश आलं.

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात ही भयंकर घटना घडली आहे. महाड तालुक्यातील बोरवाडी गावात सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला. मृतांमध्ये पाच मुली आणि एका मुलाचा समावेश आहे.

महिलेनं का उचललं टोकाचं पाऊल?

घडलेल्या घटनेबद्दल पोलिसांनी माहिती दिली. घटनेतील मृतांमध्ये पाच मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. महिलेला सासरच्या मंडळीकडून मारहाण करण्यात आली. त्यामुळे राग अनावर झालेल्या महिलेनं टोकाचं पाऊल उचलंत पोटच्या सहा मुलांना विहिरीत ढकलून दिलं.

महिलेने विहिरीत ढकलेली मुली आणि मुलगा अल्पवयी आहेत. मृत बालकं १० ते एक वर्ष वयोगटातील आहेत. रुना चिखुरी सहानी (वय ३० ) असं या महिलेचं नाव आहे. रोशनी चिखुरी सहानी (वय १०), करिष्मा चिखुरी सहानी (वय ८), रेश्मा चिखुरी सहानी (वय ६), विद्या चिखुरी सहानी (वय ५ ), शिवराज चिखुरी सहानी (वय ३) आणि राधा चिखुरी सहानी (वय दीड वर्ष) अशी मृत मुलांची नावं आहेत.

मुलांना विहिरीत ढकलून दिल्यानंतर महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला वाचवण्यात यश आलं आहे. सोमवारी रात्री १० वाजेपर्यंत चार मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच महाडचे आमदार भरत गोगावले यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

लातूरमध्येही घडली होती घटना

अशीच घटना यापूर्वी मराठवाड्यात घडली होती. लातूर जिल्ह्यात एका महिलेनं २ वर्षाच्या मुलाला विहिरीत फेकून दिलं होतं. त्यानंतर महिलेने दिराला सांगितलं होतं. सुरूवातीला महिलेच्या बोलण्यावर कुणीही विश्वास ठेवला नाही. मात्र, सायंकाळी मुलगा दिसला नाही, तेव्हा लोकांनी विहिरीत शोध घेतला. त्यावेळी मुलाचा मृतदेह आढळला होता.

लातूर जिल्ह्यातील निलंगा पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली होती. महिलेचं तिच्या पतीसोबत वाद झाला होता. त्यानंतर पती-पत्नी भाड्याने घर घेऊन राहायला लागली होती. पती मुलाला भेटायला यायची. असंच पती मुलाला भेटायला आल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर महिलेनं तिच्या दोन वर्षाच्या मुलाला फेकून दिलं होतं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in