Mumbai covid cases : मुंबईतील रुग्णसंख्या घटतेय; २४ तासांत आढळले ६,१४९ रुग्ण

१२ हजारांहून अधिक रुग्ण बरे होऊन परतले घरी, आठवड्याचा पॉझिटिव्हीटी दर १.१० टक्के
Mumbai covid cases : मुंबईतील रुग्णसंख्या घटतेय; २४ तासांत आढळले ६,१४९ रुग्ण

ओमिक्रॉनच्या शिरकावानंतर मुंबईत अचानक कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. काही दिवस दैनंदिन २० हजारांच्या आसपास रुग्ण आढळून आल्यानं मुंबईकरांच्या चिंता वाढली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून रुग्णवाढीचा आलेख खाली येताना दिसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत मुंबईत आढळून आलेल्या कोरोना रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे.

मुंबईत गेल्या २४ तासांत ६ हजार १४९ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर १२ हजार ८१० रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. मुंबईतील बऱ्या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९४,८,७४४ वर पोहोचली. मुंबईचा रिकव्हरी रेट ९४ टक्के इतका आहे. सध्या मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या ४४,०८४ इतकी असून, रुग्ण दुप्पटीचा कालावधी ६१ दिवस आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट १.१० टक्के इतका आहे.

Mumbai covid cases : मुंबईतील रुग्णसंख्या घटतेय; २४ तासांत आढळले ६,१४९ रुग्ण
Covid Update : कोरोनाचं संकट निवळलंय का?; 'कोरोना पीक'बद्दल तज्ज्ञाचं भाष्य

मुंबईत 24 तासांत सात रुग्णांचा मृत्यू झाला असून, मुंबईतील एकूण कोरोना मृतांची एकूण संख्या 16,476 वर पोहोचली आहे.

मुंबईतील रुग्णसंख्या घटतेय?

मागील तीन ते चार दिवसांपासून मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसून येत आहेत. १५ जानेवारी रोजी मुंबईत १०,६६१ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर १६ जानेवारी रोजी मोठी घट होऊन ७ हजार ८९५ रुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली, तरी दुसरीकडे चाचण्यांमध्येही मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे.

आयसीएमआरने कोविड चाचण्या करण्याच्या मार्गदर्शक नियमावलीत बदल केल्यानं त्यामुळे चाचण्यांची संख्या घटल्याचं बोललं जात आहे. ७ जानेवारी रोजी मुंबईत २० हजार ९७१ रुग्ण आढळून आले होते. तर ७२ हजार ४४२ चाचण्या करण्यात आल्या होत्या. ८ जानेवारी रोजीही मुंबईत २० हजार ३१८ रुग्ण आढळून आले होते, तर ७१ हजार १९ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या.

Mumbai covid cases : मुंबईतील रुग्णसंख्या घटतेय; २४ तासांत आढळले ६,१४९ रुग्ण
Covid Vaccination : 12 ते 14 वर्षांच्या मुलांना कधीपासून मिळणार लस? सरकारने स्पष्ट सांगितलं....

मात्र, दिवसेंदिवस चाचण्यांची संख्येत घट झाल्याचं दिसत आहे. १५ जानेवारी रोजी मुंबईत ५४ हजार ५५८ चाचण्या करण्यात आल्या. तर गेल्या २४ तासांत (१८ जानेवारी) ४७ हजार ७०० जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in