Mumbai Covid cases : मुंबईतील कोरोना रुग्णवाढ का आहे चिंता वाढवणारी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, आता इतर कोरोना रुग्णसंख्येतही झपाट्यानं वाढ होऊ लागली आहे. एका आठवड्याच्या कालावधीत मुंबईत तिप्पटीने रुग्णसंख्या वाढली असून, ही वाढ आरोग्य यंत्रणांबरोबरच प्रशासनाची चिंता वाढणारी आहे. 23 डिसेंबर रोजी मुंबईतील रुग्णसंख्येच्या आकड्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. रुग्णवाढीचा आलेख वेगाने वरच्या दिशेनं गेला आहे. दररोज केल्या जाणाऱ्या चाचण्या, चाचण्या आणि पॉझिटिव्ही यावर नजर टाकल्यास मुंबईत तिसऱ्या लाटेची सुरूवात झालीये का असा प्रश्न निर्माण होतोय.

मुंबईत नव्याने बाधित होणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. मुंबईत सोमवारी 809 जणांचे अहवाला पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोना झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 7 लाख 71 हजार 921 वर पोहोचली. मुंबईत आतापर्यंत (27 डिसेंबरपर्यंत) 16 हजार 373 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईत कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा दर (रिकव्हरी रेट) हा 97 टक्केच आहे. मुंबईतील सील करण्यात आलेल्या इमारतींची संख्या रविवारी 22 होती. ती सोमवारी 29 वर पोहोचली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मागील पंधरा दिवसांतील रुग्णवाढीचा ट्रेंड काय?

पंधरा दिवसांपूर्वी म्हणजेच 13 डिसेंबर रोजी मुंबईत 174 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यादिवशी 31,415 चाचण्या करण्यात आल्या होत्या. तर पॉझिटिव्ही रेट 0.55 टक्के होता. त्यानंतर आठवडाभरात म्हणजेच 20 डिसेंबर रोजी मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येत किंचित वाढ बघायला मिळाली. दिवसभरात 30,672 चाचण्या झाल्या, 204 रुग्ण आढळून आले.

ADVERTISEMENT

22 डिसेंबरपर्यंत रुग्णसंख्येतील वाढ मंदगतीने होत राहिली. 22 डिसेंबर रोजी मुंबईत 490 कोरोना रुग्ण आढळून आले. तर पॉझिटिव्ही रेटही 1.09 टक्क्यांवर पोहोचला होता. त्यानंतर मुंबईतील रुग्णसंख्या वाढीने वेग घेतला. 23 डिसेंबरला मु्ंबईत 602, 24 डिसेंबर रोजी 683, 25 डिसेंबर रोजी 757, 26 डिसेंबर रोजी 922, तर 27 डिसेंबरला 809 रुग्ण आढळून आले. यात चिंतेची बाब म्हणजे पंधरा दिवसांपूर्वी मुंबईचा पॉझिटिव्ही रेट 0.55 टक्के इतका होता. 26 डिसेंबर रोजी तो 2.66 टक्के, तर 27 डिसेंबरला 1.86 टक्के इतका नोंदवला गेला. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढल्याचं संकेत मिळू लागले आहे.

ADVERTISEMENT

चिंतेची बाब काय?

परदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांच्या चाचण्या केल्या जात आहेत. प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याचे नमुने जिनोम सिक्वेन्सिगसाठी पाठवले जात आहेत. मात्र, मुंबईत दररोज केल्या जाणाऱ्या चाचण्या आणि पॉझिटिव्ह रिपोर्ट येणाऱ्याच्या नमुन्यांचं जिनोम सिक्वेन्सिग केलं जात नाही. त्यामुळे रुग्णसंख्येत वाढ डेल्टा आणि सुरूवातीच्या व्हेरिएंटमुळे होतेय की नव्या हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

गेल्या आठवड्यात केंद्रीय टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी ओमिक्रॉनबद्दल चिंता व्यक्त केली होती. भारतात आढळून आलेल्या रुग्णांपैकी तीन जणांनी परदेशात प्रवास केलेला नाही. त्यामुळे ओमिक्रॉन समुदायात अस्तित्वात असल्याचेच एकप्रकारे संकेत मिळत आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळेही शंका उपस्थित होतं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT