अरेच्चा! विरोधक विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घेऊन आले 'खोके' अन् 'बोके'

हिवाळी अधिवेशन नागपूर Video : विरोधकांनी मंत्र्यांचे भ्रष्टचाराचे मुद्दे उपस्थित करत '50 खोके'वरून शिंदे गटाला डिवचलं...
mva leaders protest at outside nagpur maharashtra assembly
mva leaders protest at outside nagpur maharashtra assembly

राज्यात सत्तांतर झाल्यापासून एक घोषणा सातत्यानं कानावर पडतेय... ती म्हणजे '50 खोके एकदम ओके'. पावसाळी अधिवेशनात याच घोषणेवरून शिंदे गट चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही 50 खोके घोषणा गाजतेय. विरोधकांनी अधिवेशनाच्या नवव्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर चक्क खोक्यांबरोबर बोकेही आणले. खेळणीतील हे बोके दाखवत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in