National Herald case : सोनिया गांधी यांची ईडीकडून सुमारे तीन तास चौकशी
सोनिया गांधी यांची ईडीकडून सुमारे तीन तास चौकशी करण्यात आली. नॅशनल हेराल्ड प्रकरणात ही चौकशी करण्यात आली. सोमवारी सोनिया गांधी यांना पुन्हा चौकशीला बोलावलं जाण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांच्या चौकशीनंतर नेते जयराम रमेश म्हणाले म्हणाले की सोनिया गांधी या चौकसीसाठी ईडीसमोर उपस्थित होत्या. तुम्हाला जे विचारायचे ते तुम्ही विचारू शकता मी ८ वाजेपर्यंत बसण्यास […]
ADVERTISEMENT

सोनिया गांधी यांची ईडीकडून सुमारे तीन तास चौकशी करण्यात आली. नॅशनल हेराल्ड प्रकरणात ही चौकशी करण्यात आली. सोमवारी सोनिया गांधी यांना पुन्हा चौकशीला बोलावलं जाण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांच्या चौकशीनंतर नेते जयराम रमेश म्हणाले म्हणाले की सोनिया गांधी या चौकसीसाठी ईडीसमोर उपस्थित होत्या. तुम्हाला जे विचारायचे ते तुम्ही विचारू शकता मी ८ वाजेपर्यंत बसण्यास तयार आहे. तसेच मी उद्या देखील येण्यास तयार आहे असं सोनिया गांधी म्हणाल्या. मात्र ईडीकडे कोणतेही प्रश्न नव्हते.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मागे का लागली ED? National Herald Case
सोनिया गांधी जून महिन्यात कोरोना झाल्याने चौकशीसाठी गेल्या नव्हत्या
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना जून महिन्यात चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. मात्र सोनिया गांधी यांना कोरोना झाला होता त्यामुळे त्या येऊ शकल्या नव्हत्या. सोनिया गांधी या आज चौकशीसाठी हजर झाल्या आहेत. दुसरीकडे सोनिया गांधी चौकशीसाठी बोलवण्यात आल्याने काँग्रेस आक्रमक झालेली पाहण्यास मिळाली. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांची तीन टप्प्यात चौकशी केली जाणार आहे.
सोनिया गांधी या चौकशीला आज हजर राहिल्या. त्यांनी मास्क लावले होते. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी त्यांच्याबरोबर होते. प्रियंका गांधी यांना ईडीच्या मुख्यालयात थांबण्यास परवानगी दिली. कारण सोनिया गांधी यांना वेळेवर औषधे देता येतील. प्रियंका गांधी यांना सोनिया गांधी यांच्या खोलीपासून दूर ठेवण्यात आलं होतं.