पुणे: प्रियकराची अडचण दूर करण्यासाठी तरुणीचा मोठा प्लॅन! काकाच्या बंगल्यात घुसले अन्... प्रकरण थेट पोलिसात
पुण्यात प्रेमसंबंधातून एका तरुणीने आपल्याच काकाच्या घरात घुसून भयंकर कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे. सोमवारी कल्याणीनगर येथील एका बंगल्यात ही घटना घडली. 35 वर्षीय महिलेने या प्रकरणासंदर्भात येरवडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रियकराची अडचण दूर करण्यासाठी तरुणीचा मोठा प्लॅन!
काकाच्या बंगल्यात घुसले अन्... प्रकरण थेट पोलिसात
पुण्यातील धक्कादायक घटना
Pune Crime: पुण्यात प्रेमसंबंधातून एका तरुणीने आपल्याच काकाच्या घरात घुसून भयंकर कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित प्रकरण हे कल्याणीनगर परिसरातील असून तरुणीने आपल्याच काकाच्या घरात दरोडा टाकण्यासाठी तिच्या प्रियकराला मदत केल्याचा आरोप आहे. खरं तर, तरुणीच्या प्रियकराकडे त्याच्या घराचं भाडं भरण्यासाठी पैसे नव्हते आणि म्हणून हा भयानक प्लॅन रचण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या प्रियकरासह दोन तरुणांना अटक केल्याची माहिती आहे. यश मोहन कुऱ्डाडे (20) अशी प्रियकराची ओळख असून ऋषभ प्रदीप सिंह (21) आणि राज विवेक भैरामडगीकर (20) या साथीदारासोबत मिळून त्याने प्रेयसीच्या काकाच्या घरात दरोडा टाकला. 35 वर्षीय महिलेने या प्रकरणासंदर्भात येरवडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
बंगल्यात चाकू आणि दोरी घेऊन घुसले अन्...
सोमवारी कल्याणीनगर येथील एका बंगल्यात ही घटना घडली. संध्याकाळी 4:30 वाजताच्या सुमारास अचानक दोन अनोळखी तरुण बंगल्यात चाकू आणि दोरी घेऊन घुसले. मात्र, घरातील महिलांनी आरडाओरडा केल्याने आरोपींना चोरी करण्याची संधी मिळाली नाही आणि चोरटे पळून गेले. या प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदाराने तक्रार नोंदवली आणि त्यानंतर, पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांची चौकशी केली.
हे ही वाचा: इंस्टाग्रामवर दोन मुलांच्या आईचे पुरुषाशी जुळले सूत अन् चार वर्षांच्या मुलीसोबत गेली पळून! पती पोलिसात गेला अन्...
दरोडा टाकण्याचा प्लॅन
चौकशीतून या घटनेमागचा प्लॅन उघडकीस आला. खरं तर, यश कुऱ्डाने याचे तक्रारदार महिलेच्या दिराच्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं आणि प्रियकराला त्याच्या घराचं भाडं भरण्यासाठी 30,000 रुपयांची गरज असल्याने तरुणीने आपल्याच काकाच्या घरात चोरीचा प्लॅन केला.
ठरवल्याप्रमाणे, संबंधित तरुणीने काकाच्या घराचा दरवाजा उघडून ठेवला होता आणि त्यानंतर, यश आणि त्याचे साथीदार चोरीसाठी घरात घुसले. मात्र, आरोपी घरात घुसल्यानंतर उपस्थित घरातील महिलांनी आरओरडा करण्यास सुरूवात केली आणि त्यामुळे आरोपींना घरात चोरी करता आली नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींना ताब्यात घेतलं असून प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.










