Mumbai Drug Case: नवाब मलिकांनी ड्रग्स केस प्रकरणात NCB वर केले 5 गंभीर आरोप

Nawab Malik made 5 serious allegations against NCB: मुंबई ड्रग्स केस प्रकरणी NCB ने केलेल्या कारवाईबाबत काही प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Mumbai Drug Case: नवाब मलिकांनी ड्रग्स केस प्रकरणात NCB वर केले 5 गंभीर आरोप
Nawab Malik made 5 serious allegations against NCB mumbai drug case aryan khan shahrukh khan bjp(फोटो सौजन्य: Facebook)

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB)ने तीन दिवसांपूर्वी मुंबईतील क्रूझवरील ड्रग्स पार्टीवर केलेल्या कारवाईबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मलिकांनी NCB आणि भाजपवर घणाघाती टीका केली आहे. जाणून घेऊयात त्यांच्या पत्रकार परिषदेतील पाच आरोप.

1. नवाब मलिकांनी केलेला आरोप क्रमांक 1

NCB चा अधिकारी नसलेला 'तो' माणूस म्हणजे छाप्यात काही तरी काळंबेरं: NCB ने जो छापा टाकला त्यावेळी आर्यन खान याला NCB च्या कार्यालयात खेचून घेऊन येणारा माणूस हा नेमका कोण होता? याचं त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. व्हायरल झालेला सेल्फीमधील तो माणूस देखील हाच आहे. पण NCB म्हणते की, तो आमचा अधिकारी नाही. जर असं असेल तर या छाप्यात नक्कीच काही तरी काळंबेरं आहे. असा थेट आरोप मलिकांना केला आहे.

2. नवाब मलिकांनी केलेला आरोप क्रमांक 2

छाप्यातील दुसरा व्यक्ती तर भाजपचा उपाध्यक्ष मनिष भानुशाली: याच प्रकरणात अरबाज मर्चंट याला देखील अटक करण्यात आली. ज्याला NCB कार्यालयात घेऊन जाणारा दुसरा व्यक्ती हा मनिष भानुशाली नावाचा व्यक्ती होता.'

'हा मनिष भानुशाली भाजपचा उपाध्यक्ष आहे. तो देखील NCB चा अधिकारी नाही. मनिष भानुशाली याचे फोटो मोदी आणि अमित शाह यांच्यासोबत आहेत. देवेंद्र फडणवीसांसोबत आहे, गुजरातच्या अनेक मंत्र्यांसोबत आहेत, केंद्रीय मंत्र्यांसोबत आहेत. त्यामुळे आता NCB ला सांगावं लागेल की, मनिष भानुशाली याचे NCB शी काय संबंध आहेत. NCB च्या रेडमध्ये भाजपचा पदाधिकारी सामील झालाच कसा? म्हणजेच NCB भाजपच्या इशाऱ्यावर काम करतं' असं म्हणत मलिकांनी दुसरा गंभीर आरोप केला आहे.

3. नवाब मलिकांनी केलेला आरोप क्रमांक 3

जप्त केलेल्या वस्तू पंचांशिवाय झोनल ऑफिसमध्येच उघडल्या: NCB ने केलेल्या कारवाईबाबत शंका उपस्थित करत काही मूलभूत प्रश्न नवाब मलिक यांनी विचारले आहेत.

'जेव्हा हे सगळं शनिवार आणि रविवारी सुरु होतं तेव्हा एनसीबीने काही फोटो चॅनलच्या प्रतिनिधींना पाठवले. ज्यामध्ये चरस, कोकेन आहे असं सांगण्यात आलं. या गोष्टी आम्ही क्रूझवर जप्त केल्याचं देखील त्यांनी सांगितलं. पण NDPS कायद्यात जप्तीची एक प्रक्रिया आहे.'

'हे जे फोटो आहेत ते कोणत्याही क्रूझवरील नाहीत. हे फोटो झोनल डायरेक्टरच्या ऑफिसमधील आहे. त्याचा एक व्हीडिओ मी तुम्हाला दाखवतो.' असा आरोप यावेळी नवाब मलिक यांनी केला आहे.

4. नवाब मलिकांनी केलेला आरोप क्रमांक 4

NCB ची कारवाईच बनावट: ड्रग्स प्रकरणात करण्यात आलेली कारवाई ही बनावट आहे. असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी आरोप करतान असं सांगितलं की, 'जेव्हा ड्रग्स प्रकरणात छापेमारी होते तेव्हा जप्त केलेल्या वस्तूंचा पंचनामा केला जातो. हा सगळा जप्तीचा माल कोणासमोरही उघडता येत नाही. फक्त कोर्टात मॅजिस्ट्रेटच्या समोर ते उघडलं जातं आणि तात्काळ सील केलं जातं.'

'पण ज्या पद्धतीने ड्रग्स असल्याचा दावा करणारे फोटो हे मीडियामध्ये देण्यात आले त्या व्हिडीओ आणि फोटो यातून हेच दिसतं की, या वस्तू क्रूझवर सापडलेल्या नाही. कारण त्या झोनल ऑफिसमध्येच दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरणच बनावट आहे.' असा थेट आरोप मलिकांकडून करण्यात आला आहे.

Nawab Malik made 5 serious allegations against NCB mumbai drug case aryan khan shahrukh khan bjp
'पुढचं टार्गेट शाहरुख असं ते...', मलिकांच्या पत्रकार परिषदेतील प्रत्येक शब्द जसाच्या तसा!

5. नवाब मलिकांनी केलेला आरोप क्रमांक 5

NCB चे ऑफिस म्हणजे भाजपचं कार्यालय: दरम्यान, यावेळी पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी भाजपवर देखील गंभीर आरोप केला आहे.

'गेल्या वर्षभरापासून महाविकास आघाडीला वेगवेगळी प्रकरणं रचून बदनाम करण्याचं काम भाजपकडून सुरु आहे. संपूर्ण एनसीबीचा वापर हा भाजप आपल्या विरोधकांना बदनाम करण्यासाठी करत आहे. एनसीबीचं ऑफिस हे भाजपचं कार्यालय झालं आहे' असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.