शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठी राष्ट्रवादीचा प्लान काय? जयंत पाटील यांनी उघड सांगितला

राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवत आहे असा आरोप करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे...
jayant patil on shiv sena split and uddhav thackeray
jayant patil on shiv sena split and uddhav thackerayMumbai Tak

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवत आहे. राष्ट्रवादीचे मंत्री शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री त्यांच्या पराभूत उमेदवारांना ताकद देत आहेत, असे अनेक आरोप करत सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. त्यानंतर शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेवून भाजपसोबत सरकार स्थापन केले. तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबतचे 15 आमदार यांनी महाविकास आघाडी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेससोबतच राहणे पसंत केले.

आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरेंच्या नेतृत्वातील याच शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्लान राष्ट्रवादी काँग्रेसने आखला आहे. इतकेच नाही तर हा प्लॅन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उघडही केला आहे. ते जळगावमधील पक्ष मेळाव्यामध्ये बोलत होते.

jayant patil on shiv sena split and uddhav thackeray
MNS हलाल विरुद्ध झटका वाद पुन्हा उफळला, यशवंत किल्लेदार आक्रमक, राज ठाकरेंचे मनसैनिकांना नवे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवा... : जयंत पाटील

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सध्या राजकीय पक्षांच्या सभासद, क्रियाशील कार्यक्रत्यांची नोंदणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना जयंत पाटील म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना अशी आघाडी होणार आहे. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपल्याला प्रत्येक तालुक्यात सभासद संख्या, सक्रिय कार्यकर्त्यांची संख्या अधिक करावी लागणार आहे. जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सभासद संख्या अधिक असल्याचं दिसलं तर आपल्याला त्याठिकाणची जागा मागता येणारे नाही. यासाठी राष्ट्रवादीची ताकद दाखवावी लागेल.

jayant patil on shiv sena split and uddhav thackeray
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळावा हायजॅक करणार का? देवेंद्र फडणवीस यांनी दिलं उत्तर, म्हणाले...

आगामी निवडणुकांमध्ये ज्याचे कार्यकर्ते जास्त त्यांची ती जागा?

जयंत पाटील यांच्या या वक्तव्यावरून आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुकीत ज्या पक्षाची ताकद जास्त, कार्यकर्ते जास्त, त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना तिकीट देण्यात येतील, असे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच सूत्र ठरले तर नाही ना अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. जर असे सूत्र ठरले असल्यास शिवसेनेवर कुरघोडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरु केली असल्याचे जयंत पाटील यांच्या भाषणानंतर बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in