NIA चं सर्च ऑपरेशन, मिठी नदीत सापडला हरवलेला DVR

दिव्येश सिंह

मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणाचा तपास करणाऱ्या NIA ने आज मुंबईतील मिठी नदी पात्रात सर्च ऑपरेशन केलं. सचिन वाझे यांच्या ठाणे येथील साकेत सोसायटीमधील सीसीटीव्हीचा DVR गायब झाला होता. हा DVR वाझे आणि त्यांच्या पथकाने मिठी नदीच्या पात्रात टाकल्याचा संशय NIA ला होता. यासाठी सचिन वाझेंना सोबत घेऊन […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणाचा तपास करणाऱ्या NIA ने आज मुंबईतील मिठी नदी पात्रात सर्च ऑपरेशन केलं. सचिन वाझे यांच्या ठाणे येथील साकेत सोसायटीमधील सीसीटीव्हीचा DVR गायब झाला होता. हा DVR वाझे आणि त्यांच्या पथकाने मिठी नदीच्या पात्रात टाकल्याचा संशय NIA ला होता. यासाठी सचिन वाझेंना सोबत घेऊन काही स्थानिकांच्या मदतीने NIA ने मिठी नदीत सर्च ऑपरेशन केलं. यात NIA ला DVR आणि कॉम्प्युटरचा एक CPU मिळालेला आहे. हा DVR वाझेंच्या साकेत सोसायटीमधल्या सीसीटीव्हीचाच असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

महत्वाची गोष्ट म्हणजे NIA ला या सर्च ऑपरेशनमध्ये DVR आणि CPU व्यतिरीक्त काही नंबरप्लेटही मिळाल्या आहेत. अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतही अशाच प्रकारे नंबरप्लेट सापडल्या होत्या. त्यामुळे NIA च्या हातात या सर्च ऑपरेशनमध्ये महत्वाचे धागेदोरे हाती लागल्याचं कळतंय.

दरम्यान मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात सचिन वाझे यांना NIA कस्टडी वाढवण्यात आली आहे. ३ एप्रिलपर्यंत सचिन वाझे NIA च्या कस्टडीत असणार आहेत. दरम्यान प्रत्येक दिवशी या प्रकरणात नवनवीन बाबी समोर येत आहेत. मनसुख हिरेन यांची हत्या झाल्यानंतर सचिन वाझेंनी आपण मुंबईत असल्याचं दाखवण्यासाठी डोंगरी येथील टिप्सी बारवर रेड केल्याचं भासवलं. टिप्सी बारचे मॅनेजर राजेंद्र शेट्टी यांनी यासंदर्भातली माहिती तपासयंत्रणांना दिली आहे.

चार मार्चला हिरेन यांची हत्या झाल्यानंतर रात्री वाझे आणि त्यांचे काही सहकारी डोंगरी येथील टिप्सी बारमध्ये रेड मारत आहेत असं भासवण्यासाठी गेले. खरंतर त्यावेळी बार हा बंद होता, कोणी ग्राहकही त्यावेळी तिकडे हजर नव्हतं. सचिन वाझे यांच्यासोबत २० पोलीस अधिकारी हजर होते. या रेडदरम्यान सर्व पोलिसांनी मास्क घातला होता. चार मार्चला रात्री साडेअकरा वाजता वाझे या बारमध्ये आले आणि यानंतर बारचे कागदपत्रं तपासण्याच्या बहाण्याने अडीच वाजेपर्यंत थांबले होते. मात्र या रेडमध्ये वाझे यांच्या पथकाला काहीही अवैध हाती न लागल्यामुळे रात्री अडीचनंतर ते पुन्हा बारबाहेर पडले. एटीएसच्या पथकाला इथलं सीसीटीव्ही फुटेज मिळालं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp