Omicron: देशातल्या 23 राज्यांमध्ये पसरला ओमिक्रॉन, सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रूग्ण देशातल्या 23 राज्यांमध्ये पसरले आहेत. आत्तापर्यंत देशभरातल्या 23 राज्यांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 1270 रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 450 रूग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी ही चिंतेचीच बाब मानली जाते आहे. कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टाच्या तुलनेत वेगाने पसरणारा व्हेरिएंट आहे. या व्हेरिएंटने महाराष्ट्राची झोप उडवली आहे. महाराष्ट्रासह देशभरात ओमिक्रॉनचे रूग्ण […]
ADVERTISEMENT

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रूग्ण देशातल्या 23 राज्यांमध्ये पसरले आहेत. आत्तापर्यंत देशभरातल्या 23 राज्यांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 1270 रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 450 रूग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी ही चिंतेचीच बाब मानली जाते आहे.
कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टाच्या तुलनेत वेगाने पसरणारा व्हेरिएंट आहे. या व्हेरिएंटने महाराष्ट्राची झोप उडवली आहे. महाराष्ट्रासह देशभरात ओमिक्रॉनचे रूग्ण वाढत आहेत. मात्र सर्वाधिक रूग्ण आढळत आहेत ते महाराष्ट्रात.
Omicron Death: भारतात पहिला ओमिक्रॉन रुग्ण दगावला, पिंपरी-चिंचवडमध्ये 52 वर्षीय कोरोना रुग्णाचा मृत्यू
महाराष्ट्रात कोरोनाच्या 450 रूग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 125 जणांना त्यांची टेस्ट निगेटिव्ह आल्याने घरी सोडण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.