धक्कादायक.. पाकिस्तानी सागरी सुरक्षा सैनिकांच्या गोळीबारात पालघरच्या तरुणाचा मृत्यू

मुंबई तक

पालघर: गुजरातमधील जलपरी या बोटीवर पाकिस्तानी सागरी सुरक्षा सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील वडराई गावातील श्रीधर रमेश चामरे (वय 32 वर्ष) या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रीधर हा गुजरातमधील वनगबारा येथील जलपरी बोटीत मागील अनेक महिन्यापासून खलाशी कामगार म्हणून काम करत होता. दरम्यान, काल (7 नोव्हेंबर) श्रीधर ओखा-पोरबंदर भागातील समुद्रात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पालघर: गुजरातमधील जलपरी या बोटीवर पाकिस्तानी सागरी सुरक्षा सैनिकांनी केलेल्या गोळीबारात पालघर जिल्ह्यातील वडराई गावातील श्रीधर रमेश चामरे (वय 32 वर्ष) या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

श्रीधर हा गुजरातमधील वनगबारा येथील जलपरी बोटीत मागील अनेक महिन्यापासून खलाशी कामगार म्हणून काम करत होता. दरम्यान, काल (7 नोव्हेंबर) श्रीधर ओखा-पोरबंदर भागातील समुद्रात बोटीवर मासेमारी करीत होता. त्याचवेळी अचानत पाकिस्तान ट्रॉलर्समधून आलेल्या सागरी सुरक्षा सैनिकांनी गोळीबार सुरु केला.

याच गोळीबारात श्रीधर चामरे याला तीन गोळ्या लागल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचप्रमाणे बोटीचे कॅप्टन तांडेल यांनाही गोळ्या लागल्याने ते देखील जखमी झाले आहेत. दरम्यान, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भर समुद्रात घडलेल्या या भयंकर घटनेचा संपूर्ण मच्छीमार बांधवासहित चामरे कुटुंबीयांनी निषेध व्यक्त केला असून पाकिस्तानविरोधात सरकारने कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. तसेच श्रीधर चामरेच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जावी अशीही मागणी केली जात आहे.

भर समुद्रात नेमकं काय घडलं?

हे वाचलं का?

    follow whatsapp