Petrol-diesel Price : हुश्श! दिवाळीआधी पेट्रोल-डिझेल दरवाढीला ब्रेक

सात दिवसांनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ नाही : जाणून घ्या प्रमुख शहरातील दर
Petrol-diesel Price : हुश्श! दिवाळीआधी पेट्रोल-डिझेल दरवाढीला ब्रेक
पेट्रोलचे दर नव्या उच्चांकावर...File Photo - India Today

भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढलेले असतानाच पेट्रोल-डिझेलच्या दराने त्यात भर टाकली आहे. दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ आहे. मात्र, दिवाळीआधी दरवाढीला ब्रेक लागल्यानं इंधन दवाढीच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. मात्र, बुधवारी तेल वितरक कंपन्यांनी दरात कोणतीही दरवाढ न केल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. मागील सलग सात दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असताना तेल वितरक कंपन्यांनी दिवाळीच्या एक दिवस अगोदर दिलासा दिला.

मागील सात दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर दररोज 35 पैशांनी वाढले आहेत. आज दरवाढ न झाल्यानं दर कायम आहेत. सध्या राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर लिटरमागे 110.04 रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेलही 98.42 रुपये लिटर झालं आहे.

दुसरीकडे देशाची आर्थिक राजधानी मुंबईलाही पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या झळा सोसाव्या लागत आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 115.85 रुपये, तर डिझेल 106.62 रुपये लिटर झालं आहे.

देशातील चार महानगरांतील इंधनाच्या दराची तुलना केल्यास सर्वाधिक महाग दर मुंबईत आहेत. तर दिल्ली वगळता इतर शहरांमध्ये डिझेलच्या दरांनी कधीच शंभरी ओलांडली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या अधिभारामुळे पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील दर (प्रतिलिटर/रुपयांमध्ये)

मुंबई - पेट्रोल : 115.85 डिझेल : 106.62

पुणे - पेट्रोल : 115.66 डिझेल : 104.78

नागपूर - पेट्रोल : 115.65 डिझेल : 104.81

औरंगाबाद - पेट्रोल : 117.37 डिझेल : 106.44

नाशिक - पेट्रोल : 116.06 डिझेल : 105.17

ठाणे - पेट्रोल : 115.69 डिझेल : 104.79

कोल्हापूर - पेट्रोल : 115.91 डिझेल : 105.06

जळगाव - पेट्रोल : 116.08 डिझेल : 105.21

नांदेड - पेट्रोल : 118.63 डिझेल : 107.67

रत्नागिरी - पेट्रोल : 117.89 डिझेल : 106.96

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in