पुणे: वडील-भावाकडून 11 वर्षीय मुलीवर अनेकदा बलात्कार, तर आजोबा आणि मामाकडून विनयभंग

पुण्यात एका 11 वर्षीय मुलीवर तिच्याच वडिलांनी आणि भावाने अनेकदा बलात्कार केल्याचे समोर आले आहे. तसचे मुलीचे आजोबा आणि मामा देखील विनयभंग करत असल्याचं उघड झालं आहे.
pune an 11 year old girl was repeatedly raped by father and brother and molested by grandfather and uncle
pune an 11 year old girl was repeatedly raped by father and brother and molested by grandfather and uncle(प्रातिनिधिक फोटो)

पुणे: पुण्यातील विविध शाळा, महाविद्यालमध्ये 'गुड टच अ‍ॅन्ड बॅड टच' संदर्भात लेक्चर घेण्यात येत आहेत. त्यातून अनेक धक्कादायक घटना या समोर येत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे.

पुण्यातील ताडीवाला रोड येथील एका 11 वर्षीय मुलीने तिच्यावर तब्बल 6 वर्षापासून वडील आणि भाऊ बलात्कार असल्याची अत्यंत घृणास्पद घटना आता समोर आली आहे. एवढंच नव्हे तर पीडित मुलीचे आजोबा आणि तिचा चुलत मामा यांच्या अत्याचाराला देखील तिला सामोरे जावे लागत असल्याचे आता उघड झाले आहे.

पीडित मुलीवर वडील आणि भाऊ हे सातत्याने बलात्कार करत होते. तर आजोबा आणि चुलत मामा हे वारंवार मुलीचा विनयभंग करत असल्याचा आरोप आता पीडित मुलीने केला आहे. या सगळ्या प्रकरणी आता बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या गुन्हे निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध शाळा, महाविद्यालयमध्ये 'गुड टच अ‍ॅन्ड बॅड टच'बद्दल मुलींना माहिती दिली जात आहे.

याच अंतर्गत फेब्रुवारी ते 14 मार्च दरम्यान ताडीवाला रोड येथील एका शाळेत अशाच स्वरुपाच्या लेक्चरचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये 11 वर्षीय मुलीने तिथे असलेल्या समुपदेशक आणि शिक्षकांना मागील सहा वर्षापासून विविध ठिकाणी तिच्यावर वडील, भाऊ या दोघांकडून बलात्कार झाल्याचे सांगितले तर आजोबा आणि चुलत मामाकडूनही विनयभंग होत असल्याचं तिने यावेळी सांगितलं.

हे सर्वजण तिला भीती दाखवून अत्याचार करीत असल्याचेही पीडित मुलीने सांगितले आहे. त्यामुळे आपण हा सगळा अत्याचार सहन करत असल्याचे मुलीने सांगितले. तसेच या प्रकरणी पीडितेच्या भावाला आता अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या सगळ्या प्रकाराने मुलीच्या मनावर बराच आघात झाला असून आता मुलीला समुपदेशक हे या आघातातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे.

पुण्यातील संतापजनक घटना! नराधम बापाचा 14 वर्षाच्या लेकीवर बलात्कार

पुण्यासारख्या शहरात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटना या वाढत आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील हडपसर भागात एका 14 वर्षीय मुलीवर बापाने बलात्कार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी नराधम बापाला तात्काळ अटक केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपली मुलगी घरामध्ये झोपलेली असताना तिला किचनमध्ये ओढून नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

pune an 11 year old girl was repeatedly raped by father and brother and molested by grandfather and uncle
अकोला: पोटच्या अल्पवयीन मुलीवर सलग 2 वर्ष बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला कोर्टाने सुनावली 'ही' शिक्षा

अत्याचार केल्यानंतर याबद्दल तू आईला सांगितलं, तर तिला जिवे मारून टाकेन, अशी धमकीही आरोपीने मुलीला दिली होती. मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडल्यानंतर आरोपीने दुसर्‍या दिवशी मुलीच्या आईला घराबाहेर हाकलून दिले आणि पुन्हा तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली.

या दोन्ही घटना 1 आणि 2 मार्च रोजी घडल्या होता. अखेर या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली. ही तक्रार मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in