Pune Audio Clip: पुण्यातील भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप Viral

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: राज्यात महिला सुरक्षेवरुन सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच आता पुण्यातील भाजपच्या एका आमदाराने पुणे महानगरपालिकेतील महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिविगाळ केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केला आहे. याबाबतची एक ऑडिओ क्लिप सध्या पुण्यात प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे याप्रकरणावरुन आता भाजपवर तुफान टीका सुरु आहे.

पुणे महापालिकेतील ड्रेनेज विभागातील काही बिलं थकीत असून त्याचे पैसे संबंधित ठेकेदारांना तात्काळ देण्यात यावे यासाठी भाजप आमदाराने महिला अधिकाऱ्याला शिविगाळ केल्याचा आरोप रुपाली चाकणकर यांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय म्हटलं आहे ते आपण जाणून घेऊयात.

‘त्या’ ऑडिओ क्लिपमधील संभाषण जसंच्या तसं

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आमदार: हॅलो.. मॅडम नमस्कार.. काय प्रॉब्लेम झाला.. किती वेळा फोन करायचा.. नाही म्हणून सांगा ना एकदाच. वर्किंग बिलाबाबत.. मग मी बघतो पुढे काय करायचं ते.

सुश्मिता शिर्के: तुम्ही साहेबांशी फोन करुन बोला..

ADVERTISEMENT

आमदार: त्याच्या xxx xxx त्याला काय दहा वेळा फोन करु काय? xxx xxx xxx xx शंभर वेळा मी फोन लावतो. फोन लावायला मी काय नोकर आहे का तुमचा?… हॅलो..

ADVERTISEMENT

सुश्मिता शिर्के: मी आता काय बोलणार

आमदार: तुमच्या xxx xx… आत्ताच्या आता ते काम करुन द्या.

दुसरा व्यक्ती: मॅडम फोन देऊन गेल्या..

आमदार: स्पीकर फोन सुरु कर… xxx xxx हॅलो.. फोन चालू ठेव ना तिच्यासमोर.. xxx xxxx…

सुश्मिता शिर्के: हॅलो साहेब…

आमदार: आता त्या गेडामच्या xxxx xxx दहा वेळा फोन केला.. तुम्ही आता मला फोन करायला सांगायेत का गेडामला? मी काय नोकर आहे का तुमचा? तुम्ही फोन लावा त्याला आणि त्याला सांगा मला फोन करावं म्हणून 10 मिनिटात. नाही तर xxxx xxx xxx..

अशाप्रकारेचं संभाषण झाल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. मात्र, असं असलं तरीही ‘मुंबई तक’ या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

भाजपसारख्या असंस्कृतपणाच्या चिखलात ही अशीच कमळं उगवणार: रुपाली चाकणकर

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी अत्यंत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. पाहा रुपाली चाकणकर नेमकं काय म्हणाल्या:

‘भाजप आमदार सुनील कांबळे यांनी त्यांच्या नालायकपणाच्या आणि बेशरमीच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. ठेकेदारांनी न केलेल्या कामाची बिलं काढण्यासाठी पुणे महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्या सुश्मिता शिर्के यांना त्यांच्या आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या. हे अतिशय संतापजनक आहे. पालिकेत आपली सत्ता आहे, आपण आमदार आहोत याचा माज सुनिल कांबळे आपण आपल्या घरी दाखवावा. पालिका कर्मचाऱ्यांवर नाही.’

Pune DCP, साजूक तुपातल्या फुकट बिर्याणीचा फोन व्हायरल आणि गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

‘पालिका कर्मचारी हे ना तुमचे नोकर आहेत ना पक्षाचे कार्यकर्ते. की, त्यांच्यावर इतकी अरेरावी आणि माजोरडेपणा दाखवावा. सुश्मिता शिर्के आपण कायदेशीर कारवाई करावी. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष तुमच्यासोबत ठामपणे उभा राहील. आज सुनिल कांबळे ज्या पद्धतीने बोलले आहेत त्यांच्या बोलण्यातून महिलांना दुय्यम स्थान देणं. त्यांना अशा पद्धतीची वागणूक देणं. यावरुन एक दिसून येतं की, भाजपसारख्या नीचपणाच्या आणि असंस्कृतपणाच्या चिखलात ही अशीच कमळं उगवणार. कारण त्यांची मातृसंस्था असलेल्या आरएसएएसचे हे संस्कार आहेत.’

‘मात्र महाराष्ट्रातील सुजाण जनता अशाप्रकारच्या प्रवृत्तीला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. सुनिल कांबळे आपण सुश्मिता शिर्के यांची जाहीर माफी मागावी. याप्रकरणी आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो.’ असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी भाजप आणि आमदार सुनिल कांबळेंविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT