क्वीन एलिझाबेथ यांनी जपून ठेवलं होतं महात्मा गांधींचं गिफ्ट, PM मोदींनी सांगितली आठवण

मुंबई तक

Queen Elizabeth यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बकिंगहॅम पॅलेसने यासंदर्भातली माहिती दिली आहे. त्यानंतर ब्रिटन शोकसागरात बुडाला आहे. ब्रिटनसह अनेक देशांनी महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना आदरांजली वाहिली आहे. तसंच त्यांच्यासोबतचा एक फोटोही त्यांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Queen Elizabeth यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बकिंगहॅम पॅलेसने यासंदर्भातली माहिती दिली आहे. त्यानंतर ब्रिटन शोकसागरात बुडाला आहे. ब्रिटनसह अनेक देशांनी महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त केला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना आदरांजली वाहिली आहे. तसंच त्यांच्यासोबतचा एक फोटोही त्यांनी ट्विट केला आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वीन एलिझाबेथ यांच्याबाबत काय म्हटलंय?

महाराणी एलिझाबेथ द्वितीय या त्यांच्या काळातल्या एक दिग्गज म्हणून कायम स्मरणात राहतील. त्यांची कारकीर्द प्रदीर्घ राहिली आहे. त्यांनी त्यांच्या देशाला आणि लोकांना प्रेरणादायी नेतृत्व दिलं. सार्वजनिक आयुष्यात प्रतिष्ठा कशी जपावी आणि सभ्यता कशी ठेवावी हे त्यांनी त्यांच्या वर्तणुकीतून दाखवून दिलं. त्यांच्या निधनाचं वृत्त ऐकून मला दुःख झालं आहे. या दुःखाच्या काळात माझ्या संवेदना राणी एलिझाबेथ यांच्या कुटुंबीयांसोबत आणि ब्रिटनच्या लोकांसोबत आहेत या आशयाचं एक ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणतात…

२०१५ आणि २०१८ मध्ये युकेला गेलो असताना महाराणी एलिझाबेथ यांच्यासोबत झालेल्या भेटी संस्मरणीय आहेत. त्यांनी दाखवलेला कनवाळूपणा कायमच मला आठवत राहिल. आमच्या एका भेटीत महात्मा गांधी यांनी त्यांच्या लग्नासाठी भेट दिलेला रूमा दाखवला होता ही आठवणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिली आहे. त्याचप्रमाणे या दोन्ही भेटींचे फोटोही शेअर केले आहेत.

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. महाराणी एलिझाबेथ या स्कॉटलँडच्या Balmoral Castle मध्ये होत्या. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. शाही परिवाराने स्टेटमेंट काढत ही माहिती दिली आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय या ७० वर्षे राणी पदावर होत्या. आता त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा चार्ल्स हे ब्रिटनचे किंग असतील.

ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती गुरूवारीच डॉक्टरांनी दिली होती. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेत आहेत अशी माहिती बकिंगहॅम पॅलेसने दिली होती. त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. अखेर क्वीन एलिझाबेथ यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनानंतर जगभरातून शोक व्यक्त होतो आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp