Anant Ambani: अंबानींच्या घरी लगीनघाई, कोण आहे राधिका मर्चंट?

मुंबई तक

Anant Ambani Roka: मुंबई: रिलायन्स (Reliance) समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या (Anant Ambani) लग्नाची अगदी थाटामाटात तयारी सुरू झाली आहे. अनंतचा साखरपुडा (रोका) राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) झाला आहे. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी हे लहानपणापासूनचे मित्र-मैत्रिण आहेत. रिलायन्स ग्रुपचे संचालक-कॉर्पोरेट अफेअर्स परिमल नाथवानी यांनी ट्विट करून त्यांच्या साखरपुड्याविषयीची […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Anant Ambani Roka: मुंबई: रिलायन्स (Reliance) समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या (Anant Ambani) लग्नाची अगदी थाटामाटात तयारी सुरू झाली आहे. अनंतचा साखरपुडा (रोका) राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) झाला आहे. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी हे लहानपणापासूनचे मित्र-मैत्रिण आहेत. रिलायन्स ग्रुपचे संचालक-कॉर्पोरेट अफेअर्स परिमल नाथवानी यांनी ट्विट करून त्यांच्या साखरपुड्याविषयीची माहिती दिली. अनंत आणि राधिकाचा साखरपुडा राजस्थानमधील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात आज पार पडला. दोघेही लवकरच लग्न बंधनात अडकतील अशी चर्चा सध्या सुरू आहे. (Anant Ambani to marry Radhika Merchant, their ‘Roka’ ceremony was held today at Shrinathji Temple in Nathdwara, Rajasthan.)

काही दिवसांपूर्वीच ईशा अंबानी ही मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी आपल्या जुळ्या मुलांसह पहिल्यांदा पोहोचली होती. या गोष्टीचा आनंद अंबानी कुटुंबीय साजार करत असतानाचा आता अनंत अंबानीच्या लग्न सोहळ्याने या आनंदात भर पडली आहे.

Isha Ambani: नातवांसोबत पोरगी माहेरी, अंबानी खुश; 300 किलो सोनं करणार..

कोण आहे राधिका मर्चंट?

राधिकाचा जन्म हा १८ डिसेंबर १९९४ रोजी झाला. राधिका मर्चंट ही एनकोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. २८ वर्षांची राधिका एक ट्रेंड डान्सर आहे. राधिकाही तिच्या वडिलांच्या व्यवसायात मदत करते. तिने श्री निभा आर्ट्सच्या गुरु भावना ठाकर यांच्याकडून भरतनाट्यम शिकले आहे. ती मुळची गुजरातमधील कच्छची आहे. राधिका आणि अनंत हे बालपणीचे मित्र-मैत्रिण आहेत.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या यांच्या लग्नाच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर बऱ्याच व्हायरल होत आहेत.

Isha Ambani : जुळ्या मुलांसह इशा अंबानी भारतात दाखल… कसं झालं स्वागत?

अनंत अंबानी रिलायन्स न्यू एनर्जीचा कारभार हाताळतो

अनंत अंबानी रिलायन्स ग्रुपमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स न्यू एनर्जी बिझनेसची कमान अनंत अंबानीला फेब्रुवारी २०२१ला सोपावण्यात आली आहे. अनंतला रिलायन्स ओ टू सी चे संचालक बनवण्यात आले. यापूर्वी, अनंतचा जियो प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स बोर्डावर समावेश करण्यात आला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp