सांगली कोर्टाचा कर्नाटक एसटी महामंडळाला दणका; अपघाताची नुकसान भरपाई न दिल्याने बस केली जप्त

कोर्टाने आदेश दिल्यानंतरही नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत होतं एसटी महामंडळ
सांगली कोर्टाचा कर्नाटक एसटी महामंडळाला दणका; अपघाताची नुकसान भरपाई न दिल्याने बस केली जप्त
कर्नाटक एसटीचा ताबा भोसले यांच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात आला.

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या कर्नाटक परिवहन मंडळाला सांगली न्यायालयाने दणका दिला आहे. कोर्टाच्या आदेशानंतरही 8 लाख 33 हजारांची नुकसान भरपाई न दिल्यामुळे कोर्टाने कर्नाटक एसटी महामंडळाची बसच जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण, जाणून घ्या...

सांगलीतील मिरज शहरामध्ये 2015 साली एक अपघात घडला होता. या अपघातामध्ये कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसची धडक बसल्याने दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या भानुदास भोसले यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी भोसले कुटुंबाने सांगली न्यायालयात नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला होता. ज्यात 2016 सालात सांगली न्यायालयाने कर्नाटक परिवहन मंडळाला मृत भोसले यांच्या कुटुंबियांना 8 लाख 33 हजार 563 रुपये देण्याचे आदेश दिले होते.

मात्र कोर्टाच्या आदेशानंतरही कर्नाटक एसटी महामंडळ भोसले कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यासाठी टाळाटाळ करत होतं.

एसटी महामंडळ टाळाटाळ करत असल्याचं लक्षात येताच भोसले यांच्या पत्नीने पुन्हा सांगली न्यायालयात धाव घेतली. ज्यानंतर सांगली न्यायालयाने कर्नाटक एसटी महामंडळाची बस जप्त करुन नुकसान भरपाई वसुल करण्याचे आदेश दिले. कोर्टाचे आदेश आल्यानंतर सांगली कोर्टातील बेलीफने सांगली एसटी आगारातून कर्नाटक महामंडळाची एसटी बस जप्त करत तिचा ताबा मृत भानुदास यांच्या पत्नी विजया भोसले यांच्याकडे सोपवला आहे.

Related Stories

No stories found.