शाळांमध्ये ताप तपासणी टाळावी, कोविड चाचण्या कराव्यात; आयसीएमआरची सूचना
दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असून, जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलं आहे. अनेक राज्यांनी शाळा सुरू करण्याचाही निर्णय घेतला असून, सरकारकडून विद्यार्थ्यांच्या नियमित ताप तपासणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. मात्र, आयसीएमआरच्या संशोधनकांनी एका शोधनिबंधात ताप तपासणी टाळून शाळांमध्ये कोविड चाचण्या कराव्यात अशी शिफारस केली आहे. आयसीएमआरशी संबंधित असलेल्या इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित करण्यात […]
ADVERTISEMENT

दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असून, जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलं आहे. अनेक राज्यांनी शाळा सुरू करण्याचाही निर्णय घेतला असून, सरकारकडून विद्यार्थ्यांच्या नियमित ताप तपासणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. मात्र, आयसीएमआरच्या संशोधनकांनी एका शोधनिबंधात ताप तपासणी टाळून शाळांमध्ये कोविड चाचण्या कराव्यात अशी शिफारस केली आहे.
आयसीएमआरशी संबंधित असलेल्या इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या या संशोधनात शाळांमध्ये कोविड चाचण्या करण्याची शिफारस करण्यात आली आहे. दररोज ताप तपासणीतून कोविडच्या निदानाबद्दल मर्यादित पुरावे आहेत. त्यामुळे स्क्रीनिंग टाळावी, असं यात म्हटलं आहे.
Corona ची तिसरी लाट सण आणि उत्सवांमुळे येणार? काय म्हणत आहेत Top experts?
इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च हे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचं ओपन एक्सेस असलेलं प्रकाशन आहे. देशामध्ये हळूहळू शाळा सुरू केल्या जात असून, याच पार्श्वभूमीवर जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका शोधनिबंधात चुकीच्या धोरणांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.