वाढत्या कोरोना संकटामुळे फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरातल्या ‘या’ राज्यांमध्येही शाळा बंद

मुंबई तक

कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गहिरं होताना दिसतं आहे. तो संसर्ग वाढू नये म्हणून महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नाशिक, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीसह बहुतांश ठिकाणच्या शाळा बंद आहेत. मात्र एकटं महाराष्ट्रच नाही तर देशातल्या अनेक राज्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढू नये म्हणू नये म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागच्या सात दिवसांमध्ये कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गहिरं होताना दिसतं आहे. तो संसर्ग वाढू नये म्हणून महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नाशिक, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीसह बहुतांश ठिकाणच्या शाळा बंद आहेत. मात्र एकटं महाराष्ट्रच नाही तर देशातल्या अनेक राज्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढू नये म्हणू नये म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागच्या सात दिवसांमध्ये कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून दिल्ली, आसाम, गुजरात ओदिशा, गोवा या राज्यांनीही पहिली ते आठवी किंवा पहिली ते नववीच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

वाढत्या कोरोना रूग्ण संख्येमुळे मुंबई लोकल बंद होणार का? आयुक्त इकबाल चहल म्हणाले…

आपण जाणून घेऊ कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये झाला आहे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय?

दिल्ली- दिल्लीमध्ये कोरोनाच्या रूग्णसंख्येत मोठी वाढ दिसू लागल्यानंतर 3 जानेवारी 2022 पासून शाळा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालयं आणि शैक्षणिक संस्था या पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहतील असं सांगण्यात आलं आहे. या सगळ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात यावं ही मुभा देण्यात आली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp