Mumbai Tak /बातम्या / Sainath Durge : शीतल म्हात्रे प्रकरण; आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अटकेत
बातम्या मुंबई

Sainath Durge : शीतल म्हात्रे प्रकरण; आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अटकेत

Sheetal Mhatre Viral video case updates: माजी नगरसेविका शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या साईनाथ दुर्गे यांना दहिसर पोलिसांनी अटक केलं आहे. साईनाथ दुर्गे यांना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून सोमवारी दुपारी ताब्यात घेण्यात आलं होतं. शीतल म्हात्रेंसह शिवसेनेतील नेत्यांकडून व्हिडीओ व्हायरल प्रकरणातील मास्टरमाईंडला अटक करण्याची मागणी होत असताना पोलिसांनी दुर्गेंना अटक केल्यानं खळबळ उडाली आहे.

शिवसेना-भाजपच्या आशीर्वाद यात्रेतील माजी नगरसेवक शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शनिवारी मध्यरात्री व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शीतल म्हात्रे यांनी थेट ठाकरे गटावर आरोप केले. व्हायरल झालेला व्हिडीओ मॉर्फ्ड असून, युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी तो व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रेंनी केला होता. शनिवारी रात्री शीतल म्हात्रेंनी रितसर तक्रार दहिसर पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरण : आतापर्यंत पाच जण पोलिसांच्या ताब्यात

शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर दहिसर पोलिसांनी धरपकड सुरू केली. दहिसर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३५४, ५०९, ५००, ३४ आणि ६७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी सुरूवातीला दोन जणांना ताब्यात घेतलं. मानस कुवर (वय 26) आणि अशोक मिश्रा (वय 45) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावं आहेत.

दरम्यान, रविवारीच एकाला शिवसैनिकांनी मारहाण करुन समतानगर पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा इसम काँग्रेसशी (Congress) संबंधित असल्याचं सांगण्यात आलं. या तिघांचीही चौकशी सुरू असताना पोलिसांनी कल्याणमधून आणखी एकाला ताब्यात घेतलं.

Sheetal Mhatre Case: कल्याणमधून पोलिसांनी कुणाला घेतलं ताब्यात?

शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणात पोलिसांनी रविवारी रात्री कल्याणमधून एका तरुणाला ताब्यात घेतलं. कल्याणमधील तिसगाव परिसरातून या तरुणाला ताब्यात घेतलं असून, विनायक डायरे असं या तरुणाचं नाव आहे. विनायक डायरे हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोशल मीडिया सेलचा कार्यकर्ता आहे. दरम्यान, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप विनायक डायरेच्या कुटुंबीयांनी केला आहे. नावं सांगूनही पोलीस तक्रार दाखल करून घेत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्याबाहेर रात्री ठिय्या मांडत घोषणाबाजी केली.

विधानसभेतही गाजलं प्रकरण

शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओचे आज (13 मार्च) विधानसभेत पडसाद उमटले. आमदार मनीषा चौधरी, भारती लव्हेकर, यामिनी जाधव यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओची चौकशी करून मास्टरमाईंड शोधून काढावा, अशी मागणी विधानसभेत केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिवसभराचे कामकाज संपण्यापूर्वी या विषयातले निवेदन सादर करावे, असे आदेश सरकारला दिले.

---------
IPL 2023 : 12 क्रिकेटपटू खेळू शकणार नाही सुरूवातीचे सामने, पहा कोण आहेत ते? मुकेश अंबानींचा दुबईतील बंगला पाहिला का?, किंमत ऐकून व्हाल हैराण! IPL : एमएस धोनी याबाबतीत सर्वात पुढे, रोहित-विराट खूपच मागे ‘मला बाथरूममध्ये नेत…’, शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा भयंकर अनुभव पोलीसाने भर रस्त्यात गर्लफ्रेंडला केलं प्रपोज, पुढे काय घडलं? Video व्हायरल Akanksha Dubey: अभिनेत्री आकांक्षाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टेम रिर्पोटमध्ये कळलं कारण अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय? रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का? WPL लाइव्ह मॅचमध्ये टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूंनी धरला ठेका, Video व्हायरल! Facebook-Instagram वर ब्लू टिक हवीये? भारतीयांसाठी असे आहेत प्लान Ayodhya: अयोध्येतील यंदाची रामनवमी आहे विशेष, भाविकांचा लोटला जनसागर सुहाना खान अमिताभच्या नातवाला करतेय डेट? Samantha Ruth Prabhu: कुटुंबीयांनी विरोध केला, पण मी…, सामंथाने सोडलं मौन रस्त्यावर विकले जाणारे ‘हे’ पदार्थ मुकेश अंबानींच्या फार आवडीचे! 15व्या वर्षी राहिलेली गरोदर… मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 2 मुलांची आई, वय 40 पेक्षा जास्त; तरीही ‘या’ अभिनेत्री… एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर