शिवजयंतीच्या मिरवणुकांना परवानगी नाही, कोरोनामुळे सरकारचा निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोना साथीच्या रोगांचं संकट अद्यापही टळलेले नाही. त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या शिवजयंतीबाबत राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शिवजयंतीचा उत्सव हा साधेपणाने साजरण्यात करण्यात यावा असे आदेश सरकारने जारी केले आहेत. तसेच यावेळी शासनाने कोणत्याही मिरवणुकांना देखील परवानगी नसल्याचं आपल्या आदेशात म्हटलं आहे.

राज्य सरकार अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रयत्नशील आहे. याच गोष्टींचा विचार करुन सरकारने शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकींना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे शिवप्रेमींना यंदाची शिवजंयती अतिशय साधेपणाने साजरी करावी लागणार आहे.

पाहा यासंबंधी जारी केलेल्या परिपत्रकात नेमकं काय म्हटलं आहे?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा सण/उत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार, दि. 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी दि. 19 फेब्रुवारी 2021 रोजी जयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने मार्गदर्श सूचना करण्यात येत आहेत.

1. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि. 18 फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी covid-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.

ADVERTISEMENT

2. दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

ADVERTISEMENT

3. तसेच, कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन फक्त 10 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

4. शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

5. आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इ.) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

6. covid-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील पालन करावे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT