भाजपचे काही नेते पिसाळलेल्या कुत्र्यासारखं वागताहेत; शिवसेना आमदाराची टीका

अनिल बोडेंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला शिवसेना आमदाराचं प्रत्युत्तर
भाजपचे काही नेते पिसाळलेल्या कुत्र्यासारखं वागताहेत; शिवसेना आमदाराची टीका

-जका खान, बुलढाणा

भाजप नेते आणि राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. बोडेंच्या टीकेला बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "राज्यात भाजपचे काही नेते पिसाळलेल्या कुत्र्यासारखं वागत आहेत. शरद पवार यांच्या कामाची उंची हे नालायक कधीच समजू शकत नाही," असा प्रतिहल्ला गायकवाड यांनी चढवला.

"महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला उभं करण्याचं काम, त्याच्या शेतीला सिंचन पोहोचवण्याचं काम, त्याच्या मालाला भाव देण्याचे काम. संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ संपूर्ण राज्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा सातबारा कोरा करण्याचं धाडस दाखवणारे देशातील एकमेव नेते शरद पवार आहेत," असं गायकवाड म्हणाले.

भाजपचे काही नेते पिसाळलेल्या कुत्र्यासारखं वागताहेत; शिवसेना आमदाराची टीका
शरद पवार यांच्यावर अनिल बोंडेंची खालच्या पातळीवर टीका?

"शरद पवार कधीही कुणावर टीका करत नाही. कधी कुणाला वाईट बोलत नाहीत, पण ८४ वर्षाच्या राजकारणात ज्याने सर्व आयुष्य लोकांसाठी वेचलं, त्यांच्या घरावर कुणी नसताना दारू पिऊन एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट त्या गुणरत्न सदावर्तेच्या सांगण्यावरून हल्ला करायला जातो. ही मर्दानगी नाही, ही नामर्दानगी आहे."

"हा गुणरत्न सदावर्ते कुणाचा कुत्रा आहे हे माहित नाही का? त्याच्या बायकोने मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. याने मराठा समाजातील शेतकऱ्यांना मारलं आणि आरक्षण मिळू दिलं नाही. याचे आणि फडणवीसांचे संबंध काय आहेत, लोकांना माहीत नाही का?," असंही गायकवाड म्हणाले.

भाजपचे काही नेते पिसाळलेल्या कुत्र्यासारखं वागताहेत; शिवसेना आमदाराची टीका
'...म्हणून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला'; आंदोलनावर शरद पवारांचं गंभीर विधान

"अनिल बोंडे सारख्या माणसानं पवारांबद्दल बोलू नये. राष्ट्रपती राजवट लागू करावी असे यांचे प्रयत्न आहेत. राज ठाकरेंच्या माध्यमातून भोंग्यावर चालीसा वाजवायच्या. या राज्यात दंगली घडवून, या राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवायची आणि मग राष्ट्रपती राजवट लावायची, अशा प्रकारचा गेम भाजपच्या लोकांचा आहे," असा आरोप आमदार गायकवाड यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.