Uddhav Thackeray : “भाजप मिंधेंच्या नेतृत्वात लढणार का? हिंमत असेल तर…” ठाकरेंनी दिलं आव्हान!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Uddhav Thackeray in malegaon rally : 

मालेगाव : तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी महाराष्ट्रातील भाजपाला (BJP) विचारतोय, तुम्ही मिंध्यांच्या नेतृत्वात निवडणुका लढणार आहात का? असं असेल तर आम्ही मिंध्यांना नेता मानून निवडणुका लढणार आहोत, हे भाजपाने जाहीर करावं, असं म्हणतं शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपला आव्हान दिलं. ते आज (रविवारी) मालेगावमध्ये शिवगर्जना सभेमध्ये बोलतं होते.

नावाएवढ्या तरी जागा द्या :

भाजप-शिवसेनेतील जागा वाटपावरून उद्धव ठाकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंवर निशाणा साधला. “शिंदे गटाला आपण 48 जागा देणार आहोत, आपल्याला भरपूर स्कोप आहे, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी बावनकुळे यांनी केलं होतं. यावर ते म्हणाले, “आहो बावनकुळेसाहेब, तुमच्या नावाएवढ्या किमान 52 जागा तरी मिंधे गटाला द्या. एवढ्या असंख्य जिवंत माणसांचं प्रेम त्याग करून ते तुमच्या खोक्यात घुसले आहेत, त्यांची काहीतरी लायकी ठेवा” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टोला लगावला..

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : Uddhav Thackeray : सावरकांवरुन राहुल गांधींना जाहीर सुनावलं, काय म्हणाले?

तुमचे 152 कुळं खाली आली तरी…

भाजपला वाटतं की आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो. तर अरे तुमचे 152 कुळं खाली आली तरी ठाकरेंपासून शिवसेना वेगळी करु शकत नाहीत. प्रयत्न करून बघायचं असेल आणि हिंमत असेल तर तातडीने निवडणूक घ्या, हिंमत असेल तर मोदींच्या नावाने मतं मागा. मी माझ्या वडिलांच्या नावाने मते मागतो. बघुया महाराष्ट्र कुणाला कौल देतो, असंही आव्हान ठाकरे यांनी यावेळी भाजपला दिलं.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंनी नाशिक सोडून मालेगावच का निवडलं? काय आहे राजकीय रणनीती?

शिंदेंनी आयुष्यभर गद्दारीचा शिक्का कपाळावर मारुन घेतला :

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करताना ठाकरे म्हणाले, स्वत:कडे कर्तृत्व शून्य असताना ते गद्दारी करून मुख्यमंत्री झाले. त्यांना अजूनही माझ्या वडिलांचं नाव वापरावं लागतंय, ही तुमची हार आहे, तुमचा पराभव आहे. ज्या शिवसेनेनं तुम्हाला राजकारणात जन्म दिला. त्या राजकारणातल्या जन्मदात्या आईच्या कुशीवर वार करणारे हे सगळे चोर भगवा अन् धनुष्यबाण घेऊन फिरत आहेत. पण गद्दारांच्या हातात भगवा शोभतं नाही. माझ्यावर प्रेम करणारा एक माणूस तुम्ही नेऊ शकला नाही. एक शिवसैनिक नेऊ शकला नाही. पण तुमच्या कपाळावर कायमचा हा शिक्का बसला आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा : ‘कोणाचीही सत्ता असो आपण पक्के’, अब्दुल सत्तारांच्या विधानानंतर अनेकांच्या भुवय्या उंचावल्या

    follow whatsapp

    ADVERTISEMENT