Money Laundering Case: शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीचं समन्स, 4 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश

मुंबई तक

मुंबई: शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आता अंमलबजावणी संचलनालयाने (ED) त्यांना समन्स बजावलं आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी ईडीने भावना गवळी यांना 4 ऑक्टोबर रोजी आपल्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कालच (28 सप्टेंबर) भावना गवळी यांचे सहकारी सईद खान यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. दरम्यान, […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आता अंमलबजावणी संचलनालयाने (ED) त्यांना समन्स बजावलं आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी ईडीने भावना गवळी यांना 4 ऑक्टोबर रोजी आपल्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कालच (28 सप्टेंबर) भावना गवळी यांचे सहकारी सईद खान यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती.

दरम्यान, भावना गवळी यांना जरी ईडीने समन्स बजावलेलं असलं तरी त्या या समन्स स्वीकारुन चौकशीला हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ईडीने समन्स बजावल्यानंतर भावना गवळी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण त्यांचे विश्वासू सहकारी सईद खान यांना आधीच ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अशावेळी भावना गवळी यांना देखील चौकशीला बोलावल्याने त्यांच्यावर ईडी काही कारवाई करु शकते का? याकडेच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

भावना गवळी यांना का बजावण्यात आलं आहे समन्स?

भावना गवळी यांच्या आईसह सईद खान हे महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेचे संचालक होते. 2019 मध्ये या संस्थेला फर्ममध्ये सामील करून घेण्यात आलं. त्यापूर्वी ट्रस्ट होती. या ट्रस्टमध्ये स्वतः भावना गवळी आणि त्यांची आई शालिनीताई या सदस्य होत्या. ट्रस्टचे रुपांतर फर्ममध्ये करत असताना धर्मादाय आयुक्तालयात फसवणूक केली गेली असल्याचा ईडीला संशय आहे. त्याचबरोबर फर्मचा वापर फसवणूक आणि मनी लाँड्रिंगसाठी केल्याचाही संशय आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp