अनैसर्गिक पावसामुळे मुंबईत Landslide, संजय राऊतांकडून BMC ची पाठराखण

रविवारी विविध ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये ३२ जणांचा मृत्यू
संजय राऊत, खासदार शिवसेना
संजय राऊत, खासदार शिवसेना फोटो-आज तक

रविवारचा दिवस मुंबईकरांसाठी अत्यांत वेदनादायी ठरला. मुंबईत माहुल, विक्रोळी, भांडूप, अंधेरी, कांदिवली अशा विविधी ठिकाणी भूस्खलनामुळे झालेल्या अपघातात ३२ जणांना आपले प्राण गमवावे लागले. माहुल परिसरात घराची भींत कोसळून १९ जणांना आपले प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेनंतर महापालिकेच्या कारभारावर टीका होत असताना, आजच्या 'सामना' अग्रलेखातून महापालिकेची पाठराखण करण्यात आली आहे.

मुंबईतली दुर्घटनांची दरड ही अनैसर्गिक पावसामुळे कोसळली. काहीही झालं की मुंबई महापालिकेच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला हवं अशा शब्दांत शिवसेनेने टीकाकारांना उत्तर दिलंय. पावसाळ्यापूर्वी आणि प्रत्यक्ष मुसळधार पाऊस कोसळतो तेव्हा प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेतली जात असते. तरीही कधीकधी ‘अनैसर्गिक’ पावसाचा ‘दगाफटका’ होतो, असंही अग्रलेखात म्हटलंय.

संजय राऊत, खासदार शिवसेना
Mumbai Rain : मुंबईला रेड अलर्ट! पालघर, ठाणे, रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाचा इशारा

जाणून घेऊया काल झालेल्या दुर्घटनांमध्ये कोणत्या ठिकाणी किती जणांनी आपले प्राण गमावले-

  • माहुल - १९

  • विक्रोळी - १०

  • भांडूप - १

  • अंधेरी पश्चिम - १

  • कांदिवली पूर्व - १

संजय राऊत, खासदार शिवसेना
Mahul Landslide : भिंत खचली, चूल विझली! जेव्हा पाऊस काळ बनून येतो..

अग्रलेखामध्ये BMC ची पाठराखण करताना शिवसेनेने, "मुंबईतील जागेची अडचण आणि त्या तुलनेत असलेली मोठी लोकसंख्या यामुळे निवासाचा प्रश्न पूर्वांपार बिकट आहे. त्यातून मुंबई आणि उपनगरांमधील छोटे-मोठे डोंगरही सुटलेले नाहीत. निसरड्या डोंगरउतारांवर वसलेल्या या झोपडपट्ट्यांत हजारो कुटुंबे पिढ्यानपिढ्या राहत आहेत. दर पावसाळ्यात त्या वस्त्यांवर दरड कोसळण्याचा धोका असतो."

संजय राऊत, खासदार शिवसेना
Mumbai Rain Updates : शनिवारी रात्री 11 ते पहाटे 4 च्या दरम्यान सर्वाधिक पावासाची नोंद

मुळात मुंबईच्या स्वतःच्या भौगोलिक मर्यादा आहेत. त्याच्या विपरीत लोकसंख्येचा भार या शहराला पेलावा लागत आहे. आधीच जागेची मर्यादा आणि त्यात अमर्याद मानवी लोंढे यामुळे मिळेल तेथे, जमेल तसे राहा हे समीकरण दृढ झाले. मानवी लोंढे न थांबल्याने मुंबईतील निवासाचे गणित अधिकच जटील झाले आहे असा युक्तीवाद केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in