धक्कादायक… कोरोनाच्या विळख्यात चिमुकले, ‘या’ जिल्ह्यात तब्बल 374 मुलांना कोरोनाची लागण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रोहित वाळके

अहमदनगर: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत धोका लहान मुलांना जास्त असल्याचे सांगितले असताना आता महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. काल (रविवार) एकाच दिवसात 0-14 वयोगटातील तब्बल 374 मुलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्याने संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

अहमदनगर  जिल्हा प्रशासनाने यावर खुलासा देत ही आकडेवारी एका दिवसाची नसून तीन दिवसाची असल्याचे आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांनी सांगितले. तर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले म्हणतात आमच्याकडे अद्याप संपूर्ण आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे एकूणच शासकीय पातळीवर प्रशासनाच्या सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव सर्वात जास्त पाहायला मिळाला मार्च महिन्यापासून. साधारण 20 मेपर्यंत  रोज 4000 च्या जवळपास रूग्ण हे नगर जिल्ह्यात आढळून येत होते. मात्र, जिल्ह्यात कडक निर्बंध लावल्यामुळे संख्या कमी झाली असली तरी आता लहान मुलांच्या संख्येत वाढ होण्यास सुरवात झाली आहे. अहमदनगर  जिल्ह्यात रविवारी 374 रूग्ण आढळून आले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये का वाढतोय प्रादुर्भाव?

ADVERTISEMENT

अहमदनगर शहराचे आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांनी याबाबत ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितले की, ‘जिल्ह्यात कोरोना रूग्णाची संख्या वाढत होती. शहरात 800 पेक्षा जास्त रूग्ण होते तर जिल्ह्यात 5000 पर्यंत रूग्ण एकाच दिवशी आढळून येते होते. 45000 रूग्ण अॅक्टिव्ह होते. पण गेल्या पंधरा दिवसापासून या संख्येत घट होताना पाहायला मिळत आहेत, अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या आता 10 हजारापर्यंत खाली आली आहे. सध्या अहमदनगर जिल्ह्यात 1800च्या जवळपास रूग्ण आढळून येत असन 100 ते 150 रूग्ण हे शहरात आढळून येत आहेत.’

ADVERTISEMENT

कोरोनामुळे बाललैंगिक अत्याचार आणि विधवांचं प्रमाण वाढत आहे

सध्या लॉकडाऊनचा असल्यामुळे रुग्णसंख्या अटोक्यात असल्याचं पाहायला मिळत आहे. पण असं असलं तरीही आता सर्वात चिंतेची बाब म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह बालकांची आकडेवारी वाढत आहे. त्याबाबत जी काही आकडेवारी समोर आली आहे ती आठ दिवस किंवा तीन दिवसापूर्वीची आहे. पोर्टल आपलोड केल्यामुळे ती कालच्या दिवशी एन्ट्री झाली असं दिसत आहे. 375 पैकी शहरात 10 केस आढळल्या आहेत. त्यापैकी  80% मुलं असे आहेत की त्यांना सात-आठ दिवसांपूर्वी सर्दी खोकल्याच्या त्रास होता. पण आज ते व्यवस्थित आहेत.’

Corona ची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा वेगळी का ठरते आहे?

‘एक मुलगी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. परंतु तिला अॅनिमिया व थायरॉईडचा आजार आहे. त्यामुळे तिला दाखल करण्यात आलं आहे. जिल्हा रूग्णालय हे कोव्हिड सेंटर असल्यामुळे तिची टेस्ट केल्ययानंतर ती पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही टास्क फोर्स तयार केली असून त्यांच्यासमोर हा विषय ठेवणार आहोत. जरी लहान मुलांची संख्या समोर येत असली तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, जर एखाद्या कुटुंबातील सर्व लोक पॉझिटव्ह येत असल्याने मुलांना देखील लागण होत आहे. पण लहान मुलांना बाकीचे कोणतेही आजार आढळून येत नसल्याने घाबरण्याचे कारण नाही.’ अशी माहिती आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांनी दिली आहे.

अहमदनगर शहरात लहान मुलांच्या खाजगी हास्पिटलमध्ये रोज 10 रूग्ण आढळून येत असल्याचे बालरोग तज्ज्ञ दीपक अग्रवाल यांनी  ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितले की, ‘मागच्या दोन महिन्यांपासून दुसरी लाट सुरू झाली. मुलांमध्ये पण कोरोनाचे प्रमाण वाढले आहे. ज्या कुटुंबातील सर्व जण पॉझिटिव्ह आले आहेत तेथे सहाजिकच आहे की मुलं देखील पॉझिटव्ह येत आहेत. जेव्हापासून तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होऊ लागला तेव्हापासून लहान मुलांचे देखील प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली होती.’

Ground Report: कोरोना शहरातून गावाकडे, कोरोनाचा आता ग्रामीण भागात धुमाकूळ

‘मागील दोन महिन्यांपासून रोज 10 ते 12 लहान रूग्ण आढळून आले आहेत. पण 80% लहान मुले ही लक्षणं नसलेली अथवा सौम्य लक्षणं असलेली आहेत. यापैकी बरीच मुलं ही घरीच बरे होत असल्याचे दिसून आले आहे. खूप कमी मुलांना ऑक्सिजनची गरज भासली आहे. तर अंत्यत कमी प्रमाणात आयसीयूची गरज पडली. सुदैवाने अजूनपर्यंत एकही मृत्यू झाल्याचं आढळून आलेलं नाही.’ असं डॉक्टर अग्रवाल म्हणाले.

लहान मुलांच्या कोरोना रूग्णाची आकडेवारीत वाढ होत असल्याबाबत जिल्हाधिकारी  राजेंद्र भोसले यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, अद्याप आम्ही लहान मुलांची आकडेवारी तयार केली नसून जो आकडा समोर आला आहे त्याबाबत चौकशी करत असून लहान मुलांची आकडेवारी तयार करण्यासंदर्भात काम चालू आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT