Sanjay Raut: ‘मौन सबसे अच्छा उत्तर…’, राऊतांचं भुवया उंचवणारं ट्विट; यामागचा नेमका अर्थ काय?

मुंबई तक

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून राजकीय धुळवडच सुरु आहे. यात केवळ आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि राजकीय कुस्ती सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. या सगळ्या विरोधक आणि सत्ताधारी दोघेही अजिबातच मागे नाही. पण या सगळ्यामुळे देशाच्या पातळीवर राज्यातील राजकीय वातावरण अत्यंत गढूळ असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशावेळी आता शिवसेनेची (Shiv Sena) मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे नेते […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून राजकीय धुळवडच सुरु आहे. यात केवळ आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि राजकीय कुस्ती सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. या सगळ्या विरोधक आणि सत्ताधारी दोघेही अजिबातच मागे नाही. पण या सगळ्यामुळे देशाच्या पातळीवर राज्यातील राजकीय वातावरण अत्यंत गढूळ असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशावेळी आता शिवसेनेची (Shiv Sena) मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मात्र आज (29 मार्च) एक असं ट्विट केलं आहे. ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

राज्यात सत्ताबदल झाल्यापासून भाजपकडून सातत्याने शिवसेनेवर टीकेची झोड उठवली जात आहे. या सगळ्या टिकेला शिवसेनेचे नेते नेहमीच प्रत्युत्तर देतात मात्र, शिवसेना खासदार संजय राऊत हे विरोधकांवर असा काही शाब्दिक मार करत आलेत की, त्यामुळे विरोधक देखील घायाळ झाले आहेत. कधी पत्रकार परिषद तर कधी सामनातील अग्रलेख.. प्रत्येक पातळीवर संजय राऊत हे शिवसेनेसाठी ढाल बनून उभे राहिल्याचं पाहायला मिळालं आहे.

पण आता याच संजय राऊतांनी चक्क ‘मौन’ पाळण्याचा सल्ला आपल्या ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे. संजय राऊत यांनी आपला एक फोटो पोस्ट करत त्यासोबत ‘कभी कभी मौन सबसे अच्छा उत्तर होता हैं…’ एवढाच मजकूर पोस्ट केला आहे.

संजय राऊत यांच्या याच पोस्टमुळे आता राजकीय वर्तुळात मात्र वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

‘या’ मौनाचा नेमका अर्थ काय?

संजय राऊत हे कायमच आपल्या विरोधकांना अंगावर घेत आले आहेत. यावेळी विरोधकाला नामोहरम करण्यासाठी ते सगळ्या नितींचा वापर करताना दिसतात. त्यातही त्यांचे शाब्दिक फटकारे हे अत्यंत बोचरे असतात. मागील काही दिवसात तर त्यांची भाषा शिवराळ झाल्याचं देखील पाहायला मिळालं आहे. या मागचं कारण म्हणजे केंद्रीय यंत्रणांचा महाविकास आघाडीच्या मागे लागलेला ससेमिरा. पण असं असताना आता अचानक राऊतांनी ‘मौनाची’ भाषा केली आहे.

खरं म्हणजे राजकारणातील प्रत्येक कृतीला वेगवेगळे अर्थ असतात. राजकीय क्षेत्रात वावरणारी व्यक्ती ही प्रत्येक कृती अत्यंत चालाखीने करत असल्याचं आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं आहे. अशावेळी संजय राऊतांसारख्या व्यक्तीमत्वाने मौन पाळणं हे चांगलं उत्तर असतं असं म्हटल्याने आता या मौनाचा सूचक अर्थ काय? असा सवाल उपस्थित झाला आहे.

एकीकडे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांवर भाजपकडून सातत्याने गंभीर आरोप सुरु आहेत. त्यांचे दोन मंत्री आताही तुरुंगातच आहेत. शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा सुरु आहे. राऊतांच्या पत्नीची देखील काही दिवसांपूर्वीच ईडीने चौकशी केली होती. अशावेळी आपण भाजपला जशास तसे उत्तर दिलं पाहिजे असा एक सूर शिवसेनेतील नेत्यांमध्ये आहे. असं सगळं असताना अचानक संजय राऊतांनी मौन पाळणं हेच योग्य असल्याचं म्हटल्याने आता महाराष्ट्राच्या राजकारण काही नव्या घडामोडी घडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

सोमय्यांना हातोडा घेऊ द्या, फावडं घेऊ द्या; आम्ही दिल्लीच्या तख्तासमोर नमणार नाही – विनायक राऊत

यामुळे पुढील काही काळात संजय राऊत यांच्या ट्वीटचा नेमका अर्थ काय हे स्पष्ट होईलच. पण सध्या राज्यातील एकूण राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना इतर काही गोष्टींची किंवा पर्यायांची तपासणी तर करत नाहीए ना? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

तूर्तास तरी संजय राऊतांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या शंका-कुशंका निर्माण झाल्या आहेत. ज्या खऱ्या की खोट्या हे येत्या काही काळात महाराष्ट्राला समजेलच. म्हणूनच महाराष्ट्रात राजकीय पातळीवर यापुढे नेमकं काय-काय घडतं याकडे लक्ष ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp