Solapur : CID फेम ऑफिसरसाठी रिअल पोलीस धावले… 4 तासांत गुन्ह्याचा छडा
CID Actor Arpit Kapoor : सोलापूर : CID या लोकप्रिय मालिकेत पोलीस अधिकाऱ्याची (CID Actor) भूमिका करणाऱ्या अभिनेता अर्पित कपूर (Arpit Kapoor) यांच्या मदतीला रिअल पोलीस धावून आले. अर्पित कपूर यांच्या पत्नी श्रमिका यांचे चोरीला गेलेले दागिने अवघ्या काही तासांतच पोलिसांनी शोधून काढले. अर्पित कपूर यांच्याकडे हे दागिने सुपूर्द केल्यानंतर दोघांनीही पोलिसांच्या (Solapur Police) तपासाबाबत […]
ADVERTISEMENT

CID Actor Arpit Kapoor : सोलापूर : CID या लोकप्रिय मालिकेत पोलीस अधिकाऱ्याची (CID Actor) भूमिका करणाऱ्या अभिनेता अर्पित कपूर (Arpit Kapoor) यांच्या मदतीला रिअल पोलीस धावून आले. अर्पित कपूर यांच्या पत्नी श्रमिका यांचे चोरीला गेलेले दागिने अवघ्या काही तासांतच पोलिसांनी शोधून काढले. अर्पित कपूर यांच्याकडे हे दागिने सुपूर्द केल्यानंतर दोघांनीही पोलिसांच्या (Solapur Police) तपासाबाबत समाधान व्यक्त केलं. अर्पित कपूर यांनी ‘सीआयडी’ सह अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. (A Real Police help cid fame Police office to find wife’s missing jewellery )
नेमकं काय घडलं?
अर्पित कपूर हे मेहुण्याच्या लग्नासाठी त्यांच्या पत्नी श्रमिकासोबत सोलापूरला आले होते. त्यावेळी त्यावेळी श्रमिका कपूर मेकअप करण्यासाठी रूममध्ये गेल्या. तेव्हा सोन्याचं मंगळसूत्र मेकअप टेबलासमोर होते. मेकअप केल्यानंतर श्रमिका मंगळसूत्र न घेताच गडबडीत निघून गेल्या. ही गोष्ट त्यांना दोन तासानंतर लक्षात आली. परत रुममध्ये जाऊन पाहिल्यानंतर मंगळसूत्र तिथे नव्हतं. हरवलेल्या मंगळसूत्राचा शोध घेतला पण ते मिळालं नाही. त्यामुळे मंगळसूत्र चोरीला गेल्याचं लक्षात आलं. त्यानंतर कपूर दाम्पत्यानं मिळून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी कसा लावला छडा?
मंगळसूत्र चोरीला गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही तपासले. त्यानंतर ज्यांच्यावर संशय होता त्या सर्वांची पोलिसांनी चौकशी केली. चौकशीदरम्यान मेकअप करणाऱ्या महिलेवर त्यांचा संशय बळावला. चौकशीत महिलेने आपणच दागिने घेतल्याचं कबूल केलं. अवघ्या काही तासात घटनेचा तपास करुन पोलिसांनी अर्पित कपूर यांच्याकडे हे दागिने सुपूर्द केल्याने अर्पित कपूर आणि श्रमिका कपूर यांनी पोलिसांचे आभार मानले.
Crime: आईसोबत अनैतिक संबंधांचा संशय, तरुणांच्या कृत्यानं हादरलं नांदेड
दरम्यान, पोलिसांनी दागिने चोरलेल्या महिलेविरोधात फिर्याद द्यायला सांगितलं असता कपूर यांनी फिर्याद द्यायला नकार दिला. महिलेने चूक झाल्याचं मान्य केलं. गुन्ह्यामुळे एखाद्याचं संपूर्ण करिअर बरबाद होऊ शकते. त्यामुळे आपण तक्रार देत नाही. मात्र पोलिसांनी ज्या गतीने हा तपास केला ते पाहून आनंद झाला अशी भावना अभिनेता अर्पित कपूर आणि त्यांच्या पत्नीने व्यक्त केली आहे. अर्पित कपूर ‘सीआयडी’ या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.