मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा मुक्काम तुरुंगातच! जामीन नाकारला

विद्या

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून तुरुंगात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यालयातील विषेश पीएमएलए न्यायालायात आज झालेल्या सुनावणीत न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी याबाबत निर्णय दिला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंगच्या आरोपांखाली फेब्रुवारी महिन्यात ईडीने नवाब मलिक यांना अटक […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून तुरुंगात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यालयातील विषेश पीएमएलए न्यायालायात आज झालेल्या सुनावणीत न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी याबाबत निर्णय दिला. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंगच्या आरोपांखाली फेब्रुवारी महिन्यात ईडीने नवाब मलिक यांना अटक केली होती. सध्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांच्यावर कुर्ला येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

नवाब मलिक यांच्यावर काय आहेत आरोप?

कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडमध्ये तीन एकरची जागा आहे. ही जागा मुनिरा प्लंबर यांची होती. मुनिरा यांनी आपली जागा हडपण्यात आल्याची तक्रार मलिक यांच्या विरोधात केली आहे. नवाब मलिक यांनी दाऊदची बहीण हसीना पारकरसोबत मिळून ही जागा हडपली, असा आरोप आहे. याच प्रकरणात त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केले, त्यानंतर त्यांनी टेरर फंडिंगही केलं असेही आरोप करण्यात आले आहेत. हे दोन मुख्य आरोप त्यांच्यावर आहेत.

याच आरोपांखाली फेब्रुवारी महिन्यात मलिक यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यात ईडीने त्यांच्याविरोधात चार्जशिटही दाखल केलं आहे. या चार्जशीटमध्ये मनी लाँड्रिग प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे. नवाब मलिक यांनी पैसे हसीना पारकर, सलीम फ्रूट आणि सरदार शहावली खान यांना कॅश आणि चेकच्या स्वरूपात पैसे दिले होते हा उल्लेख करण्यात आला आहे.

हसीना पारकरच्या मुलाच्या जबाबामुळे अडकले नवाब मलिक

दाऊदची बहीण हसीना पारकरचा मुलगा अलिशाह पारकर हा मुंबईत राहतो. गोवावाला कंपाऊंडचा काही भाग नवाब मलिक यांना विकल्याचा खुलासा त्याने केला. नवाब मलिक यांना फेब्रुवारी महिन्यात ईडीने मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंगच्या आरोपाखाली अटक केली. अशात अलीशाह पारकरचा जबाब हा अत्यंत महत्त्वाचा ठरला. ज्यामुळे ईडीने मलिक यांच्याविरोधात खटला उभा करण्यास मोलाची मदत केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp