मुंबईत 13 वर्षीय मुलाची आत्महत्या, ऑनलाईन गेममुळे मुलाने जीव दिल्याचा वडिलांचा दावा
कोरोना काळात शाळा बंद होत्या. त्यामुळे शिक्षणासाठी पर्याय निर्माण करण्यात आला तो ऑनलाईन शिक्षणाचा. मात्र मोबाईलच्य अतिवापरामुळे काय घडू शकतं याचं उदाहरण मुंबईत आता समोर आलं आहे. मुंबईत 13 वर्षांच्या एका मुलाने आत्महत्या केली आहे. 13 फेब्रुवारीच्या संध्याकाळी तीर्थेश खानोलकर या 13 वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ऑनलाईन गेम फ्री फायरच्या आहारी जाऊन त्यातला […]
ADVERTISEMENT

कोरोना काळात शाळा बंद होत्या. त्यामुळे शिक्षणासाठी पर्याय निर्माण करण्यात आला तो ऑनलाईन शिक्षणाचा. मात्र मोबाईलच्य अतिवापरामुळे काय घडू शकतं याचं उदाहरण मुंबईत आता समोर आलं आहे. मुंबईत 13 वर्षांच्या एका मुलाने आत्महत्या केली आहे. 13 फेब्रुवारीच्या संध्याकाळी तीर्थेश खानोलकर या 13 वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ऑनलाईन गेम फ्री फायरच्या आहारी जाऊन त्यातला टास्क पूर्ण करण्यासाठी त्याने जीव दिला असं त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे. मुंबईतल्या दादर भागात ही धक्कादायक घटना घडली आहे.
तीर्थेशचे वडील चेतन खानोलकर हे 13 फेब्रुवारीला त्यांच्या तीन वर्षांच्या लहान मुलीला घेऊन त्यांच्या पत्नीसह फिरायला गेले होते. घरी असलेल्या मुलाला अभ्यास करता यावा यासाठी ते बाहेर गेले होते. चेतन हे त्यांच्या बाईकवरून जात असताना संध्याकाळी 7 वाजून 22 मिनिटांनी त्यांचा मोबाईल वाजला. मात्र बाईक चालवत असल्याने त्यांनी तो कॉल घेतला नाही. त्यानंतर जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांना तीर्थेशने स्वतःला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे दिसले आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
धक्कादायक! बुलढाण्यात अविवाहित तरूणाने स्वतःचं सरण पेटवून केली आत्महत्या
तीर्थेश खानोलकर हा चेतन खानोलकर यांचा मोठा मुलगा. तो अभ्यासात खूप हुशार होता, शाळेत त्याचा पहिला नंबर येत असे. क्रिकेटचीही त्याला खूप आवड होता. 14 फेब्रुवारीला त्याचे अंडर 14 संघातील सिलेक्शनही होते. मात्र त्याआधीच त्याने आयुष्य संपवलं. तीर्थेशच्या वडिलांनी सांगितल्यानुसार तीर्थेश हा गेल्या काही महिन्यांपासून फ्री फायर हा एक ऑनलाईन गेम खेळत होता. या गेममधल्या टास्कमुळेच त्याने आत्महत्या केली असावी असा संशय चेतन खानोलकर आणि पोलिसांनीही व्यक्त केला आहे. कारण गळफास लावलेल्या तीर्थेशच्या तोंडालाही अर्धवट रुमाल बांधलेला होता. अर्धवट रूमाल बांधलेलं एक कॅरेक्टर या गेममध्येही आहे त्यामुळे हा कयास लावला जातो आहे. त्याच्या तोंडात कापडाचा बोळाही होता.