दोन वर्षाच्या मुलाला चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे मृत्यू, गोवंडीच्या शिवाजीनगर भागातली घटना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईच्यो गोवंडी येथील शिवाजीनगर भागात नर्सने चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे दोन वर्षीय बालकाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. ताह आजम खान असं या दुर्दैवी बालकाचं नाव असून शिवाजीनगर भागातील नूर हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार करण्यात आले.

ADVERTISEMENT

संतापजनक बाब म्हणजे या हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करणारी मुलगी ही अल्पवयीन असून तिच्याकडे नर्सिंगचा कोणताही अनुभव नसल्याचं समोर आलंय. नर्स म्हणून काम करणारी १६ वर्षाची ही तरुणी याच हॉस्पिटलमध्ये साफसफाईचं काम करत असल्याचं समोर आलंय. याप्रकरणी पोलिसांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अल्ताफ अब्दुल हसन खान, व्यवस्थापक नसिमुद्दीन सय्यद, परिचारीका सलीम उंनिसा खान आणि अल्पवयीन मुलीवर गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई विमानतळावर ७५ लाखाच्या सोन्याची तस्करी करणारा विदेशी नागरिक अटकेत

हे वाचलं का?

दोन वर्षीय ताह खानला उलटी आणि जुलाबाचा त्रास व्हायला लागल्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी घराच्या जवळच असलेल्या नूर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. यावेळी ताहच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजेक्शन कोण देणार यावरुन दोन नर्समध्ये वाद झाला. या वादातून अल्पवयीन नर्सने माझ्या मुलाला इंजेक्शन दिलं. १३ जानेवारीला डिस्चार्ज देताना नर्सने दिलेल्या या इंजेक्शननंतर ताहचा अवघ्या अर्ध्या तासात मृत्यू झाल्याची माहिती ताहचे वडील अझीम शेख यांनी दिली.

‘पुष्पा’ सिनेमा पाहून अल्पवयीन मुलांनी बनवली ‘गँग’, प्रसिद्धीसाठी केली निष्पाप व्यक्तीची हत्या

ADVERTISEMENT

पोलिसांनी दोन वर्षीय ताहला देण्यात आलेल्या इंजेक्शनचे नमुने ताब्यात घेतला आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताहला देण्यात आलेलं इंजेक्शन हे मोठ्या मुलांसाठीचं इंजेक्शन होतं. त्याची मात्रा ही लहान मुलांसाठी घातक ठरु शकते. सध्या गुन्हा नोंदवण्यात आलेले चारही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

ADVERTISEMENT

धक्कादायक! औरंगाबादमध्ये तरूणाची दगडाने ठेचून हत्या, मृतदेहाचा अर्धा भाग जाळला

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT