Mumbai terror Attack: ’26/11 नंतर पाकवर हल्ला न करणं हा कमकुवतपणा’, काँग्रेसच्याच माजी मंत्र्याचा हल्लाबोल
नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि माजी मंत्री मनीष तिवारी यांनी त्यांच्या पुस्तकात मुंबई हल्ल्यानंतर मनमोहन सिंग सरकारने कोणतीही कारवाई केली नसल्याची थेट टीका केली आहे. ‘मुंबई हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कठोर कारवाई करायला हवी होती’, असे मनीष तिवारी यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे. कारवाई न करणे हे दुर्बलतेचे लक्षण असल्याचेही त्यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: काँग्रेस नेते आणि माजी मंत्री मनीष तिवारी यांनी त्यांच्या पुस्तकात मुंबई हल्ल्यानंतर मनमोहन सिंग सरकारने कोणतीही कारवाई केली नसल्याची थेट टीका केली आहे. ‘मुंबई हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कठोर कारवाई करायला हवी होती’, असे मनीष तिवारी यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे. कारवाई न करणे हे दुर्बलतेचे लक्षण असल्याचेही त्यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.
मनीष तिवारी यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, ‘जेव्हा एखाद्या देशाला (पाकिस्तान) निष्पाप लोकांच्या हत्येचा पश्चाताप होत नाही, तेव्हा संयम हे ताकदीचे लक्षण नसून दुर्बलतेचे लक्षण आहे. 26/11 ही वेळ होती जेव्हा शाब्दिक प्रहार करण्याऐवजी थेट कारवाई करण्याची गरज होती.’ मनिष तिवारी यांनी मुंबई हल्ल्याची तुलना ही अमेरिकेतील 9/11शी केली आणि भारताने त्यावेळी तात्काळ प्रत्युत्तर दिले पाहिजे होते. असंही म्हटलं आहे.

मनीष तिवारी यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी पंजाबमधील राजकीय अस्थिरतेबाबत ते म्हणाले होते की, ‘ज्यांच्याकडे पंजाबची जबाबदारी देण्यात आली आहे त्यांना ते समजत नाही.’ याशिवाय कन्हैया कुमारच्या काँग्रेस प्रवेशावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते.
