Dubai Floods: आभाळच फाटलं! दुबई तुंबली! अचानक इतका पाऊस का पडला?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Dubai Rain Update : संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि त्याच्या आसपासच्या देशांमध्ये मंगळवारी (16 एप्रिल) मुसळधार पाऊस झाला. पावसाचा जोर इतका वाढला की, अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. मुसळधार पावसामुळे, UAE मधील प्रमुख महामार्गांचे काही भाग पूर्णपणे जलमय झाले आहेत आणि दुबईमध्ये रस्त्यांवर उभी असलेली वाहने पाण्यात बुडाली आहेत. (Dubai Floods Rain in Dubai What is the real reason behind the flood situation)

पावसाने घातलेलं थैमान पाहता यूएई प्रशासनाने लोकांना घरात राहण्याची विनंती केली. शाळांनी ऑनलाइन वर्ग घेतले. सरकारी कर्मचाऱ्यांनाही घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे. दुबई हे वाळवंटात वसलेले एक शहर आहे. येथील विकास आणि तंत्रज्ञान सर्वांनाच थक्क करते. 16 एप्रिल 2024 रोजी अचानक येथे विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडू लागला आणि काही वेळातच पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. 

विमानतळ, मेट्रो स्टेशन, मॉल, रस्ते आणि ऑफिसांमध्ये पुराचे पाणी शिरले. शाळा बंद ठेवण्यात आल्या. याचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरलही होत आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या 24 तासात 160 मिमी पाऊस झाला. जो सहसा दोन वर्षांत होतो. ही एक मोठी नैसर्गिक आपत्ती आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अनेक उड्डाणे करावी लागली रद्द!

जगातील सर्वात रहदारीच्या विमानतळांपैकी एक असलेल्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (DXB) संचालन सुमारे 25 मिनिटे थांबवण्यात आले. त्यामुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली तर, काहींना डिले झाला.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, 'क्लाउड सीडिंग म्हणजेच कृत्रिम पावसामुळे हे घडले आहे. दुबई प्रशासनाने सोमवारी आणि मंगळवारी क्लाउड सीडिंगसाठी विमाने उडवली होती. यामध्ये काहीतरी गडबड झाल्याचे दिसते. हवामानात आवश्यक बदल घडवून आणण्याचा हा मानवाने केलेला निष्काळजीपणाचा प्रयत्न होता.'

ADVERTISEMENT

गल्फ स्टेट नॅशनल सेंटर ऑफ मेटिरॉलॉजीने सांगितले की, '15-16 एप्रिल रोजी अल-ऐन विमानतळावरून क्लाउड सीडिंग विमाने उडवण्यात आली होती. दोन दिवसांत या विमानांनी सात वेळा उड्डाण केले. यावेळी क्लाउड सीडिंगमध्ये काहीतरी चुकल्यासारखे दिसते. याचे परिणाम दुबईला भोगावे लागत आहेत.'

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT