Ajit Pawar : "...मग सूनेने काय नुसतं बघत बसायचं का?", अजित पवार शरद पवारांवर भडकले

मुंबई तक

Ajit Pawar On Sharad Pawar : अजित पवार यांनी शरद पवार यांनी सुनेत्रा पवारांबद्दल केलेल्या विधानाला काय दिले उत्तर?

ADVERTISEMENT

अजित पवार आणि शरद पवार.
अजित पवार यांची शरद पवार यांच्यावर टीका
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बारामती लोकसभा मतदारसंघ निवडणूक

point

शरद पवारांचे सूनेत्रा पवारांबद्दल विधान

point

अजित पवारांचे शरद पवारांना उत्तर

Ajit Pawar on Sharad Pawar, Baramati Lok Sabha Election 2024 : (वसंत मोरे, बारामती) बारामतीतील लोकसभा मतदारसंघातील सुपे येथे महायुतीचा संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित पवारांनी शरद पवारांनी केलेल्या मूळचे पवार आणि बाहेरचे पवार या विधानाला उत्तर दिले. (Baramati lok sabha latest News : Ajit Pawar Hits Out at Sharad Pawar)  

"काही वडीलधारे जरा जुना काळ आठवत असेल... त्यांना म्हणावं जुना काळ आता बाजूला ठेवा. आता नवीन काळ बघा. आता सासूचे चार दिवस संपलेत, आता सुनेचे चार दिवस येऊ द्या. असं सांगा ना. कायम सासू... सासू.. सासू... मग सूनेने काय नुसतं बघत बसायचं का?", असा सवाल अजित पवारांनी शरद पवारांना केला. 

असं कुठं असतं का राव? अजित पवारांचा सवाल

अजित पवार पुढे म्हणाले, "बाहेरची... बाहेरची... बाहेरची. असं कुठे असतं का राव? आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे बघतो. पण, ४० वर्षे झाली तरी बाहेरची? किती वर्ष झाल्यावर घरची? सांगा आया बहिणींनो... बघा बाबा आता...", असे उत्तर अजित पवारांनी शरद पवारांना दिलं. 

खासदाराची पर्स कोण सांभाळणार?

सुप्रिया सुळे यांनी खासदारांची पर्स सांभाळणार का? असं म्हणत अजित पवारांना डिवचलं होतं. त्यालाही अजित पवारांनी उत्तर दिलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp