हिंगोली : कंटेनर – ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू, २४ जण जखमी
हिंगोली-नांदेड राज्य महामार्गावरील पारडी मोड शिवारात कंटेनर आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आत्ता पर्यंत चार जणांचा जीव गेल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय अपघातात २४ जणं जखमी झाले आहेत. या जखमींपैकी सहा जण गंभीर झाले असून त्यांना तात्काळ नांदेड येथील रुग्णालयात उचराकरता हलवण्यात आलं आहे. इतर जखमींवर कळमनुरी येथील उप-जिल्हा रुग्णालयात उपचार […]
ADVERTISEMENT
हिंगोली-नांदेड राज्य महामार्गावरील पारडी मोड शिवारात कंटेनर आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आत्ता पर्यंत चार जणांचा जीव गेल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय अपघातात २४ जणं जखमी झाले आहेत. या जखमींपैकी सहा जण गंभीर झाले असून त्यांना तात्काळ नांदेड येथील रुग्णालयात उचराकरता हलवण्यात आलं आहे. इतर जखमींवर कळमनुरी येथील उप-जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ADVERTISEMENT
RJ 02 – GB 3945 कंटेनर आणि एम एच 38 एफ 8485 या क्रमांकाची ट्रॅव्हल्स दोन्ही वाहने नांदेडच्या दिशेने जात असतांना कळमनुरी तालुक्यातील पार्डी मोड शिवारात घटना घडली आहे. अपघात एवढा भीषण होता की ट्रॅव्हल्स मधील तीन प्रवासी जागीच ठार झाले तर एका व्यक्तीचा रुग्णालयात दाखल करतांना रस्त्यातच मृत्यू झाला. या अपघातानंतर अनेक प्रवसी अपघातग्रस्त वाहनाच्या खाली दबले गेले होते.
अमरावती : माजी राज्यमंत्री प्रवीण पोटेंच्या कॉलेजमध्ये विजेचा शॉक लागून चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू
हे वाचलं का?
घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरुवात केली. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करुन त्यात अडकलेल्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये.
ADVERTISEMENT
मृतांमध्ये हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील अजरसोंडा येथील त्रिवेणीबाई अजरसोंडकर आणि राजप्पा दगडू अजरसोंडकर यांचा समावेश आहे,तर उमरखेड तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील विठ्ठल कणकापुरे यांचा तर कळमनुरी तालुक्यातील बाभळी येथील पंचफुलाबाई गजभार यांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
रोड रोलरच्या चाकाखाली सापडून सहा वर्षांचा चिमुकला जागीच ठार, ओतूरमधली धक्कादायक घटना
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT