महाराष्ट्रातल्या 40 Sugar Mills ED च्या रडारवर?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयाने साखर कारखान्यांवर कारवाई सुरू केली आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता 40 साखर कारखाने ईडीच्या रडारवर आहेत. ईडीच्या रडारवर महाराष्ट्रातले 40 साखर कारखाने नियम डावलून कर्ज दिल्याप्रकरणी साखर कारखान्यांची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य को ऑपरेटिव्ह बँक घोटाळा 25 हजार कोटींचा आहे. त्यातील एक साखर कारखाना म्हणजे जरंडेश्वर या साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. आता राज्यातले 40 सहकारी साखर कारखाने ईडीच्या रडारवर आहेत.

ADVERTISEMENT

ईडी आता लवकरच इतर साखर कारखान्यांवरही कारवाई होऊ शकते. कारण इतर सहकारी साखर कारखान्यांच्या बाबतीही अशाचप्रकारे संशयास्पद पद्धतीने लिलाव केला जाऊ शकतो असं ईडीला वाटतं आहे. एवढंच नाही तर या प्रकरणी काही राजकीय नेत्यांचीही या प्रकरणी चौकशी होऊ शकते. त्यामुळे आता अजित पवारांच्या नंतर आणखी कोणत्या सहकारी साखर कारखान्यांवर कारवाई होणार आणि कोणत्या नेत्यांची चौकशी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अण्णा हजारे यांनी काय म्हटलं आहे?

हे वाचलं का?

साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची ईडीने कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. ईडीने गैरव्यवहार होऊन विक्री झालेल्या राज्यातील सर्व 49 सहकारी साखर कारखान्याची चौकशी करावी. राज्याच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचे आहे. राजकीय पक्ष काय आज आहेत उद्या नाही. मात्र सहकार चळवळ मोडीला काढणे हा खूप मोठा धोका आहे असं परखड मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं आहे.

मागच्या आठवड्यात ईडीच्या रडारवर 9 कारखाने होते आता मात्र 40 काऱखाने ईडीच्या रडारवर आहेत. या प्रकरणी आता कोणकोणत्या कारखान्यांवर आणि काय काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या कारवाईमुळे काही बडे नेतेही अडचणीत येण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी केंद्र सरकारने वेगळं सहकार खातं तयार करण्यात आलं आहे. ते खातं अमित शाह यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीवर त्याचा परिणाम होऊ शकतो असंही बोललं जातं आहे.

ADVERTISEMENT

कोणते 40 कारखाने ईडीच्या रडारवर?

ADVERTISEMENT

दौलत सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर

इंदिरा गांधी सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर

रयत सहकारी साखर कारखाना, सातारा

खंडाळा सहकारी साखर कारखाना, सातारा

प्रतापगड सहकारी साखर कारखाना, सातारा

यशवंत थेऊर सहकारी साखर कारखाना, पुणे

सांगोला सहकारी साखर कारखाना, सोलापूर

डॉ बाबा जनपुरे सहकारी साखर कारखाना, अहमदनगर

केदारेश्वर सहकारी साखर कारखाना, अहमदनगर

निफाड सहकारी साखर कारखाना, नाशिक

नाशिक सहकारी साखर कारखाना, नाशिक

कर्मवारी काकासाहेब सहकारी साखर कारखाना, नाशिक

पझरखान सहकारी साखर कारखाना, धुळे

शिरपूर सहकारी साखर कारखाना, धुळे

वसंत सहकारी साखर कारखाना, जळगाव

रावेर तालुका सहकारी साखर कारखाना, जळगाव

विनायक सहकारी साखर कारखाना, औरंगाबाद

देवगिरी सहकारी साखर कारखाना, औरंगाबाद

शरद सहकारी साखर कारखाना, औरंगाबाद

गंगापूर सहकारी साखर कारखाना, औरंगाबाद

जालना सहकारी साखर कारखाना, जालना

अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना, बीड

कडा सहकारी साखर कारखाना, बीड

गजानन सहकारी साखर कारखाना, बीड

डॉ. व्ही. व्ही. पाटील सहकारी साखर कारखाना, बीड

गोदावारी सहकारी साखर कारखाना, नांदेड

तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना, उस्मानाबाद

कलंबर विभाग सहकारी साखर कारखाना, नांदेड

तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना, उस्मानाबाद

नरसिंग सहकारी साखर कारखाना, उस्मानाबाद

जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना, लातूर

शेतकरी सहकारी साखर कारखाना, लातूर

शिवाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना, लातूर

संत शिरोमणी सहकारी साखर कारखाना, लातूर

जिजामाता सहकारी साखर कारखाना, बुलढाणा

जय किसान सहकारी साखर कारखाना, यवतमाळ

बापूरावजी देशमुख सहकारी साखर कारखाना, वर्धा

वसंत सहकारी साखर कारखाना, यवतमाळ

हे चाळीस सहकारी साखर कारखाने सध्या ईडीच्या रडारवर आहेत असं समजतं आहे. या कारखान्यांची मूळ किंमत किती होती, कारखाना तोट्यात कसा गेला? तोट्यात गेल्यानंतर त्याचा लिलाव कसा करण्यात आला? लिलावादरम्यान तो कुणी विकत घेतला. सध्या तिथे काय सुरू आहे? लिलावात कारखाना विकत घेणारी व्यक्ती कोणत्या राजकीय नेत्याशी संबंधित आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ईडीकडून शोधण्याचा प्रयत्न केला जाईल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT