Lockdown चा फटका, मुंबईतलं 5 Star ‘हयात रिजन्सी’ हॉटेल बंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना महाराष्ट्रात दोन महिन्यांसाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होतं. ७ जून पासून राज्यात अनलॉकची घोषणा करण्यात आली. ज्यात मुंबईतील हॉटेल आणि रेस्टॉरंट्सला परवानगी देण्यात आली आहे. एकीकडे मुंबईतील दुकानदार आणि हॉटेल व्यवसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण असताना दुसरीकडे हयात रिजन्सी या फाईव्ह स्टार हॉटेलने आपलं कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

सोमवारी रात्री उशीरा हयात हॉटेलच्या व्यवस्थापनाने याविषयी पत्रक जाहीर करत माहिती दिली. कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी कंपनीकडे पैसा नाही, त्याचसोबत दररोजचा कारभार चालवणंही आता शक्य होत नसल्यामुळे हॉटेलचं कामकाज बंद ठेवण्यात येत आहे. हयात हॉटेलचे व्यवस्थापक हरदीप मारवा यांनी कर्मचाऱ्यांना ई-मेल द्वारे याची माहिती दिली. हयात या हॉटेलची मालकी एशियन हॉटेल (वेस्ट) या कंपनीकडे आहे. सध्या कंपनी आर्थिक अडचणीत असल्यामुळे हॉटेल सुरु ठेवणं शक्य नसल्यामुळे हयात हॉटेलचं कामकाज बंद ठेवण्यात आण्याचा निर्णय घेतलाय.

हे वाचलं का?

सध्या हयात हॉटेलमध्ये थांबलेल्या ग्राहकांची सोय कशी करता येईल याबद्दल व्यवस्थापन विचार करत आहे. एशियन हॉटेल वेस्ट ही कंपनी सध्या आर्थिक डबघाईला आली आहे. २०१९-२० या काळात कंपनीला २१८ कोटींचा तोटा झाल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची बाजू मांडण्यासाठी शिवसेनाप्रणित कामगार सेनेने पुढाकार घेतला असून…कंपनीने कर्मचाऱ्यांशी संवाद साधून दोन महिन्यांपासून थकीत पगाराची भरपाई करावी असं आवाहन केलं आहे.

मुंबईकरांनो सांभाळा, हवामान विभागाकडून शहरात अतिवृष्टीचा इशारा

ADVERTISEMENT

दरम्यान हयात हॉटेलला आपलं कामकाज थांबवावं लागत असल्याबद्दल हॉटेल क्षेत्रातील मंडळींनी चिंता व्यक्त केली आहे. “गेल्या वर्षभरापासून लॉकडाउनमुळे हॉटेल व्यवसाय बंद आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास, देशांतर्गत प्रवास, कॉर्पोरेट बैठका सध्या होत नसल्यामुळे उत्पन्नाचा स्त्रोत घटत चालला आहे. हॉटेल जेवढं मोठं तेवढा त्याचा खर्च आणि इतर बाबी या जास्त असतात. गेल्या मार्च महिन्यापासून बहुतांश हॉटेल व्यवसायिकांना तोटाच सहन करावा लागतो आहे. केंद्र आणि राज्य सरकारने राज्यांना हॉटेल क्षेत्राला मदत करणं गरजेचं आहे”, असं मत हॉटेल असोसिएशनच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT