Omicron चं संकट, अकोल्यात परदेशातून आलेल्या ६२ जणांचा अजुनही संपर्क नाही
अकोला शहरात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. एक डिसेंबरपासून आजपर्यंत परदेशातून अकोला शहरात ३३४ नागरिक आले. परंतू यापैकी ६२ नागरिक अजुनही नॉट रिचेबल असल्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. या ६२ जणांपैकी अनेकांना ओमिक्रॉनची बाधा झाली असल्याची शक्यता आहे. त्यांच्यामाध्यमातून इतरांनाही याची लागण होऊ शकण्याची भीती असल्यामुळे जिल्हा प्रशासन पोलीस […]
ADVERTISEMENT
अकोला शहरात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. एक डिसेंबरपासून आजपर्यंत परदेशातून अकोला शहरात ३३४ नागरिक आले. परंतू यापैकी ६२ नागरिक अजुनही नॉट रिचेबल असल्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.
ADVERTISEMENT
या ६२ जणांपैकी अनेकांना ओमिक्रॉनची बाधा झाली असल्याची शक्यता आहे. त्यांच्यामाध्यमातून इतरांनाही याची लागण होऊ शकण्याची भीती असल्यामुळे जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणेच्या मदतीने या ६२ नागरिकांचा शोध घेत आहे. महाराष्ट्रात सध्या ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे राज्य सरकारने जमावबंदीचे आदेश दिले आहेत. परंतू या ६२ नागरिकांचा शोध लागत नसल्यामुळे अकोल्यातील प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात विविध देशांमधून आलेल्या नागरिकांनी स्वतःहून आरोग्य यंत्रणांशी संपर्क साधावा अशी विनंती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले यांनी केली आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान अकोला शहर हे रुग्णवाढीचं हॉटस्पॉट बनलं होतं. त्यामुळे या पार्श्वभूमीवर सध्या ओमिक्रॉनची रुग्ण वाढू नयेत यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT